माजी आमदार डॉ. यशवंत बाजीराव यांचा भाजप प्रवेश

नागपूर :- माजी आमदार डॉ. यशवंत बाजीराव यांनी आज (शुक्रवार) केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश घेतला. ना. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी डॉ. यशवंत बाजीराव यांनी भाजपमध्ये प्रवेश करीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय सहभाग नोंदविणार असल्याचे सांगितले. हलबा समाजाचे मोठे नेते म्हणून त्यांची नागपूरमध्ये ओळख आहे. ‘केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हलबा समाजाच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यामुळे सर्व समाज बांधवांनी आपल्या हक्कासाठी सतत परिश्रम घेणाऱ्या गडकरी यांचे हात मजबूत करावे,’ असे आवाहन डॉ. यशवंत बाजीराव यांनी यावेळी केले. 1990 ते १९९५ या कालावधीत यशवंत बाजीराव हे मध्य नागपूरचे आमदार होते. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीत त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चोखपणे जबाबदारी पार पाडावी - डॉ.स्वप्नील मोरे

Sat Apr 13 , 2024
पुणे :- शिरुर लोकसभा मतदारसंघांतर्गत निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाच्या माध्यमातून कामाचे स्वरूप जाणून घ्यावे आणि आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी अशी सूचना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.स्वप्नील मोरे यांनी केली.   हडपसर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर नियुक्त १ हजार १२० क्षेत्रीय अधिकारी, समन्वय अधिकारी, मतदान केंद्रावर प्रत्यक्ष काम करणारे केंद्रप्रमुख व सहाय्यक अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी मतदान प्रक्रिया, ईव्हीएम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com