पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात १७५ तक्रारींचे निराकरण

मुंबई :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात आज मालाड वेस्ट पी नार्थ वॉर्ड येथे १३२ तक्रारी प्राप्त झाल्या तर त्यामधील १०० तक्रारी जागीच निकाली काढण्यात आल्या.तसेच गोरेगाव वेस्ट पी साऊथ वॉर्ड येथे ७५ तक्रारी प्राप्त झाल्या असून सर्व तक्रारी जागीच निकाली काढण्यात आल्या तसेच ज्या तक्रारी प्राप्त होतील त्या देखील तातडीने सोडविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.          यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.या कार्यक्रमात महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांच्या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणा-या योजनांची माहिती महिलांना देण्यात आली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहे. हा उपक्रम ३१ मे २०२३ पर्यंत दुपारी ३ ते ५.३० वाजता सुरू राहणार आहे.अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येवू शकते.

NewsToday24x7

Next Post

रेती चोरी करणाऱ्या विरुध्द कारवाई 

Sat May 20 , 2023
सावनेर :-  दिनांक १८/०५/२०२३ रोजी पोलीस स्टेशन सावनेर चे पथकाने मौजा अजनी शिवारा जवळील उडानपुलाखाली एक ट्रक क्र एम. पी. २८ एच ०७९५ ला थांबवुन त्याचे डाल्याची पाहणी केली असता त्यामध्ये रेती भरून दिसली नमुद ट्रक चालकास रेती वाहतुक बाबत परवाना (रॉयल्टी) विचारली असता त्याने रॉयल्टी नसल्याचे सांगितले नमुद ट्रक चालकाने करसघाट येथील कन्हान नदीचे पात्रातुन शासनाचे गौण खनिजाचे अवैध […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com