रेती चोरी करणाऱ्या विरुध्द कारवाई 

सावनेर :-  दिनांक १८/०५/२०२३ रोजी पोलीस स्टेशन सावनेर चे पथकाने मौजा अजनी शिवारा जवळील उडानपुलाखाली एक ट्रक क्र एम. पी. २८ एच ०७९५ ला थांबवुन त्याचे डाल्याची पाहणी केली असता त्यामध्ये रेती भरून दिसली नमुद ट्रक चालकास रेती वाहतुक बाबत परवाना (रॉयल्टी) विचारली असता त्याने रॉयल्टी नसल्याचे सांगितले नमुद ट्रक चालकाने करसघाट येथील कन्हान नदीचे पात्रातुन शासनाचे गौण खनिजाचे अवैध उत्खनन ट्रक मध्ये अंदाजे ५ ब्रास रेती किमंती २५,०००/ रु. चा माल चोरी करुन घेवून जात असतांना मिळुन आलेला असुन ट्रकची अंदाजे किमंत १०,००,०००/ रु. असा एकुण १०,२५०००/ रु. चा माल चोरी करून घेवून जात असतांना मिळुन आला. सदर प्रकरणी फिर्यादी पोशी / २२१४ नितेश गोपाल पुसाम, नेमणुक पोस्टे सावनेर यांचे लेखी रिपोर्ट वरून आरोपी सुखशांत तुलाराम नारनवरे वय २८ वर्ष रा. वार्ड क्र ३ परसोडी वकिल ता. कळमेश्वर यावे विरुध्द पो.स्टे. सावनरे येथे अप क्रमांक अप क्र ४७१ / २३ कलम ३७९ भादवी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि व्यंकटेश दोनोडे पोस्टे सावनेर हे करित आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com