थकबाकी न भरणाऱ्या १८ लाभधारकांचे नळ कनेक्शन खंडित

चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे थकीत पाणीपट्टी वसुली अंतर्गत पाणीपट्टी कर न भरणाऱ्या १८ लाभधारकांची नळ जोडणी खंडीत करण्यात आली आहे.

महानगरपालिकेचे प्रमुख उत्पन्नाचे स्त्रोत असलेली घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्यासाठी पाठ फिरवणाऱ्या लाभधारकांसाठी विशेष मोहिम राबविली जात आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ करीता रू. १२.९७ कोटी थकीत मागणी व रू. ०५.४५ कोटी चालू मागणी अशी एकूण रू. १८.४३ कोटी पाणीपट्टी कराची वसुली थकीत आहे.

पाणीपट्टी कराचा भरणा करता यावा याकरिता मनपाची विविध पथके सुटीच्या दिवशीही कार्यरत आहेत.तसेच मोबाईल संदेश,ऑटो संदेश, फोन, सोशल मिडिया इत्यादी विविध माध्यमातुन तसेच प्रत्यक्ष भेटी देऊन कर भरण्याचे आवाहन केले जात आहे .

कराचा भरणा करणे सोपे जावे यासाठी मनपातर्फे सूट देण्यात असुन याअंतर्गत ३१ ऑक्टोबर पर्यंत एकमुस्त भरणा केल्यास १० टक्के तर ०१/११/२०२२ ते ३१/१२/२०२२ पर्यंत पाणी कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी ५ % सुट देण्यात येणार आहे. यानंतरही भरणा न केल्यास नळजोडणी बंद करण्याची कारवाई महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

थकीत पाणी कराचा भरणा प्रियदर्शिनी चौक पाणी टाकी येथील मनपाचे पाणी पुरवठा कार्यालय, झोन कार्यालय क्रमांक १- संजय गांधी मार्केट सिव्हिल लाइन्स, झोन कार्यालय क्रमांक २- कस्तुरबा भवन सात मजली इमारत गांधी चौक, झोन कार्यालय क्रमांक ३- देशबंधू चित्तरंजन दास प्राथमिक शाळा बंगाली कॅम्प येथे स्वीकारण्यात येत आहे.

www.cmcchandrapur.com या लिंकवर Pay Water Tax Online या टॅबवर सुद्धा भरणा करता येईल. शहरातील नागरिकांनी नळजोडणी बंद होऊ नये, यासाठी पाणी कर त्वरित भरण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्र राज्य स्टार्टअप सप्ताहाचा राजभवन येथे शानदार समारोप

Mon Oct 17 , 2022
अर्थ विभागाने स्टार्टअप्सना उभारणीसाठी आर्थिक सहकार्य करावे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी प्रत्येक स्टार्टअप योजनेला आर्थिक पाठबळ देणार : देवेंद्र फडणवीस स्टार्टअप उभारणी कार्याला लोक चळवळीचे रूप देणार : मंगलप्रभात लोढा  स्टार्टअप्स कंपन्यांनी सर्वसमावेशक नाविन्यतेचा ध्यास घ्यावा : डॉ रघुनाथ माशेलकर मुंबई :-  गेल्या आठ वर्षात देशामध्ये नाविन्यतेचा विशेषत्वाने पुरस्कार केल्या जात असून स्टार्टअप्सना चालना देण्यात येत आहे. अश्यावेळी युवकांनी स्वतःच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com