संविधान चौकात आरबीआय बसस्टॉप 

नागपूर :- नागपुरात सर्वात महत्त्वाच्या असलेल्या रिझर्व बँक चौकाचे संविधान चौक म्हणून पाच वर्षांपूर्वी नामांतर करण्यात आले. आता या चौकाला संविधान चौक म्हणून मान्यता मिळाल्याने शासकीय, निमशासकीय, खाजगी अश्या सर्व प्रकारचे कार्यक्रम येथेच होत असतात. मग धरणे आंदोलन असो, निदर्शने असो, सभा संमेलन असो, मोर्चाची सुरुवात असो की समापन असो. याचे मुख्य केंद्र संविधान चौकच आहे.

या मार्गाने शहरभर जाणाऱ्या बसेस मध्ये सुद्धा संविधान चौकाची नोंद आहे. परंतु संविधान चौकात असलेल्या बसस्टॉप चे नामकरण मात्र अजूनही करण्यात आलेले नाही. त्याचा आरबीआय चौक म्हणूनच उल्लेख करण्यात आलेला आहे. मनपाने दखल घेऊन आरबीआय चौक म्हणून असलेल्या बसस्टॉप चे संविधान चौक असे विना विलंब नामकरण करून आपली चूक दुरुस्त करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश बसपा चे मा मिडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केली आहे.

NewsToday24x7

Next Post

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही, कोणताही अन्याय होणार नाही : देवेंद्र फडणवीस.

Sat Sep 16 , 2023
नागपूर, 16 सप्टेंबर : ओबीसी समाजाला असलेल्या आरक्षणात कोणतेही नवीन वाटेकरी येणार नाहीत आणि ते कमी देखील होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात दिली. राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि सर्वशाखीय ओबीसी कुणबी ओबीसी महासंघाच्या वतीने नागपुरात सुरु असलेल्या साखळी उपोषणस्थळी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या समजून घेत त्यांना संबोधित केले. आ. प्रवीण […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com