आरोग्य यंत्रणा “सिकलसेल” रुग्णांच्या पाठिशी

19 जून सिकलसेल दिन

नागपूर –  नागपूर जिल्हयात सिकलसेल आजाराचे रुग्ण आढळतात. त्यामुळे संपूर्ण जिल्हा आरोग्य यंत्रणा याबाबत अतिशय जागरुक आहे. या आजारामध्ये उपचारासोबतच रुग्सणांचे समुपदेशन महत्वाचे ठरते. नागपूर जिल्हयात डागा स्मृती स्त्री रुग्णालयात समुपदेशनाची व्यवस्था आहे. याच रुग्णालयात मोफत तपासणी, रक्तपुरवठा व औषधोपचारही करण्यात येतो. 19 जून रोजी जागतिक सिकलसेल दिन आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख.

सिकलेस आजार म्हणजे काय?

            जेव्हा लाल रक्तपेशी मधील हिमोग्लोबीनमध्ये ग्लुटॅमिक ॲमिनो ॲसीडच्या ऐवजी व्हॅलीन ॲमीनो ॲसीड येते तेव्हा गोलाकार लालरक्त पेशींचा आकार बदलून त्या वक्राकार किंवा विळयासारख्या दिसायला लागतात. विळयाला इंग्रजी भाषेत सिकल असे म्हणतात तर पेशीना सेल म्हणतात. त्यावरुन या आजाराचे नांव सिकलसेल असे पडले आहे.

सिकलसेल आजाराचे प्रकार:

        सिकलसेल आजाराचे मुख्य दोन प्रकार असतात

1) सिकलसेल सफरर किंवा पिडीत व्यक्ती (SS) : वक्राकार आकाराच्या रक्तेपेशी 30 ते 40 दिवसापर्यत जीवंत राहतात, त्यामुळे पिडीत व्यक्तीला वारंवार जंतू संसर्ग होतो. व लवकर बरा होत नाही. रक्तपेशी लवकर नष्ट होतात. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होते.

2) कॅरिअर किंवा वाहक व्यक्ती (AS) : ज्या व्यक्तीला सिकलसेल आजाराच्या वाहकास त्रास होत नाही पण ती व्यक्ती पुढच्या पिढीला सिकलसेल आजार देवू शकते, अश्या व्यक्तीस सिकलसेल वाहक म्हणतात.

        सिकलसेल आजाराची लक्षणे : रक्तक्षय, हातापायावर सुज येणे, कावीळ असहय वेदना, पक्षाघात, पित्राशय,मुत्रपिंडाचे आजार, न भरुन येणा-या जखमा, डोळे, शारिरीक व मानसिक त्राास, जंतू संसर्ग.

रोगनिदान –

        सोल्युबिलीटी चाचणी:- हि चाचणी प्राथमिक आहे व यासाठी रक्ताचे दोन थेंब लागतात. पाच ते दहा मिनीटात या चाचणींचा अहवाल लगेच मिळतो. हि चाचणी सर्व आरोग्य संस्थांमध्ये ( प्राथमिक आरोग्य केंद्र उपजि रु, ग्रामिण रुग्णालय व डागा स्त्री रुग्णालय येथे व शिबीरांमध्ये करण्यात येते. या चाचणीचा अहवाल होकारात्मक असेल तर इलेक्ट्रीफीरोसीस चाचणी करण्यात येते.

            इलेक्ट्रीफीरोसीस चाचणी : सोल्युबिलीटी तपासणीमध्ये होकारात्कक आलेल्या व्यक्तिचीच चाचणी करण्यात  येते या चाचणीमध्ये व्यक्ती वाहक (AS) आहे कि रुग्ण ( SS) आहे हे कळते.

            एच.पी.एल.सी.: हि चाचणी निश्चित निदान करणारी आहे. या चाचणीव्दारे रक्तामधील वेगवेगळे घटक निश्चितपणे कळतात.                                                                                              

औषोधोपचार :-

            सिकल सेल ग्रस्त व्यक्तीने तज्ञ डॉक्टारांव्दारे नियमित  तपासणी व रक्ततपासणी करुन घेणे व योग्य आहार घेतल्यास त्यांची आयुष्याची वयोमर्यादा वाढू शकते. १) फोलिक ऍसिडच्या गोळया नियमित घेणे, (२) वैद्यकीय सल्ल्यानुसार वेदनाशामक गोळया घेणे, (३) जंतू संसर्गावरील त्वरित उपचार करणे.

उपाययोजना- ( समुपदेशन ) :

सिकलसेल आजाराचा नियंत्रणासाठी खालील बाबी करु शकतो.

1)रक्त तपासुन विवाह -– विवाहयोग्य युवक-युवतींनी लग्नाअगोदर स्वत:ची सिकलसेल तपासणी करुन घ्यावी. युवकयुवती वाहक असल्यास होणारा जोडीदार वाहक किंवा पिडीत नाही याची खात्री करावी व नंतरच लग्न ठरवावे. जर युवक युवती दोघेही वाहक असतील तर तसे लग्न ठरवू नये.

2) गर्भजल  तपासणी – गर्भवती महिला सिकलसेल ग्रस्त असल्यास किंवा पतीपत्नी दोघेही वाहक असल्यास गर्भ सिकलसेल ग्रस्त आहे का याची चाचणी गरोदरपणात 12 आठवडयचा आत गर्भजल तपासणीतून करता येते. बाळ पिडीत असल्यास गर्भपात करता येतो. गर्भजल परिक्षण व नंतर गर्भपात करणे हा निर्णय सिकलसेल पिडीत व वाहक जोडप्यांचा आहे. सदर चाचणी इंदीरा गांधी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय येथे उपलब्ध आहे.

3) सिकलसेल ग्रस्तांना कुटूंबातील इतर सदस्यांची व नातेवाईकांचा आधाराची गरज असते. सिकलसेल ग्रस्तांना वारंवार रक्ताची गरज भासते. अश्यावेळी त्याला योग्य ती मदत करावी. त्याला आधार दयावा. कुटूंबातील  प्रेमळ वातावरण्‍ व जिव्हाळा यामुळे सिकलसेल  ग्रस्त व्यक्तिच्या वेतना कमी होण्यास मदत होते. सिकलसेल व्यक्तिसोबत भेदभाव न करता त्याला शिक्षण व व्यवसायाला प्रोत्साहित करावे.

सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत मिळणा-या शासकीय सुविधा :

1) जिल्हयातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच डागा स्त्री रुग्णालय येथे मोफत सिकलसेल सोल्युबिलीटी तपासणी करण्यात येते., 2) मोफत इलेक्ट्रोफीरोसीस तपासणीची सुविधा इलेक्ट्रीफीरोसीस सेंटरवर डागा स्त्री रुग्णालय,अपजि रु. रामटेक, ग्रामिण रुग्णालय कळमेश्वर, उमरेड येथे उपलब्ध आहे., 3) डागा स्त्री रुग्णालय येथे एच.पी.एल.सी. चाचणीची मोफत सुविधा उपलब्ध आहे., 4) उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे टेलिमेडीसीन व्दारे तज्ञांचे मोफत मार्गदर्शन प्राप्त होते. 5) सर्व सिकलसेल रुग्णांना मोफत रक्त पुरवठा,औषधोपचार व समुपदेशनाची सोय उपलब्ध आहे. 6) डागा स्त्री रुग्णालय नागपूर येथे मार्गदर्शन व औषधोपचार तसेच डे-केअरची मोफत सुविधा उपलब्ध आहे. 7) इंदिरा गांधी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय नागपूर येथे गर्भवती स्त्रीयांसाठी गर्भजल परिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाते. 8) डागा स्त्री रुग्णालय नागपूर  येथे सिकलसेल ग्रस्त थॅलेसीमीया ग्रस्त व्यक्तींना मोफत रक्त संक्रमन ओळखपत्र व प्रमाणपत्रांची सुविधा उपलब्ध आहे. 9) सिकलसेल ग्रस्त, थॅलेसिमीया ग्रस्त आणि हिमोफीलीया चा रुग्णांना मोफत दिव्यांग प्रमाणपत्र सुविधा इंदिरा गांधी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय नागपूर येथे  उपलब्ध आहे.

सिकलसेल दिनाचे निमित्याने सर्व प्रा. आ. के. ग्रा. रु. स्तरावर खालीलप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

चाचणी – 1) सोल्युब्लिटी  चाचणी करणे, आवश्यकतेनुसार एच.पी.एल.सी. चाचणी करुन निश्चित निदान व त्याप्रमाणे कार्ड वाटप., 2) औषधोपचार – सिकलसेल रुग्ण यांची यादी उपलब्ध करुन घेऊन त्यांना प्राथमिक उपचार व गरजेनुसार चाचण्या , औषधोपचार व संदर्भ सेवा, 3) समुपदेशन सिकलसेल रुग्ण व वाहक यांना विवाहपूर्व, विवाहानंतर व गरेदरपणात समुपदेशन, 4) जनजागृती – जनतेमध्ये सिकलसेल  आजाराबाबत तपासणी, उपचार प्रसार व प्रतिबंध याबाबत माहिती तसेच पेन क्रायसिसि बाबत औषधोपचार व आवश्यकतेनुसार रक्तसंक्रमन याची शास्त्रोक्त माहिती. 5) प्रतिबंध – प्रसुतिपूर्व गर्भजल निदान तपासणी बाबत मार्गदर्शन करावे. व त्याच्या तपासणीबाबत सल्ला.

करीता याआगोदर ज्यांची सिकलसेल तपासणी करण्यात आली नसेल त्यांनी स्वत:ची सदर तपासणी करवून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मनपा शाळा इयत्ता10 वीचा निकाल १००%

Sat Jun 18 , 2022
३६ पैकी २६ विद्यार्थी डिव्हीजनमध्ये चंद्रपूर  – चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी शाळेचा इयत्ता १० वीचा निकाल १०० टक्के लागला असुन शाळेचे २६ विद्यार्थी डिव्हिजनमध्ये आले आहेत. मनपाद्वारा संचालित या शाळेच्या विद्यार्थ्यांची यंदाची ही पहिलीच बोर्ड परीक्षा होती. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंदांच्या नियोजनबद्ध शिक्षण पद्धतीने शंभर टक्के यश मिळाले आहे. आयुक्त राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात, अतिरिक्त आयुक्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com