कामठी माराठी पत्रकार संघाचे अध्यक्षपदी मोहन ठाकूर यांची उपस्थित कार्यकारणी सदस्यांच्या सर्वानुमते निवड

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- आज दिनांक ११ सप्टेंबर २०२३ ला सराय हनुमान मंदिर सभागृहात कामठी तालुका मराठी पत्रकार संघाची सभा घेण्यात आली. या सभेत नंदू कोल्हे,दिलीप मेश्राम,वाजीद अली,संदीप कांबळे,मोहन ठाकूर,हरीश शर्मा,ऋतिक गावंडे,नीतू दुबे, निलेश रावेकर,नितीन रावेकर,सुनिल चलपे, योगेश शर्मा आदीची प्रामुख्याने उपस्थिती होती.या सभेचे अध्यक्ष वाजीद अली होते.

या सभेत सर्वसंम्मतीने कार्यकारणी गठीत करण्यात आली. त्यात अध्यक्ष मोहन ठाकूर,सचिव मनोज नगरकर, प्रसिद्धी प्रमुख दिलीप मेश्राम,उपाध्यक्ष ऋतिक गावंडे,सहसचिव योगेश शर्मा, मुख्य सल्लागार नंदु कोल्हे, सल्लागार वाजीद अली, कोषाध्यक्ष नितु दुबे, सदस्य सुदाम राखडे,सतीश दहाट,राजेश देशमुख,निलेश रावेकर,संदीप कांबळे,हरीश शर्मा आदीचा समावेश करण्यात आला.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यातील बहुतांश तलाठी कार्यालये अजूनही भाड्याच्याच खोलीत

Tue Sep 12 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – 77 गावाचा कारभार सांभाळतात 25 तलाठी कामठी :- शेतीसंबंधी महसुलाचे कामकाज योग्य प्रकारे चालावे यासाठी शासनाने तलाठी या प्रशासकोय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून साझानुसार तलाठी कार्यालयाची निर्मिती केली आहे.तलाठी हा महसूल विभागाचा कणा असून कामठी तालुक्यातील चार महसूल मंडळातील 25 साझ्यात 25 तलाठ्या द्वारे 77 गावातील हजारो खातेदारांच्या जमिनींचे दस्तावेज आहेत .मात्र बरेच तलाठी कार्यालय हे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com