पारशिवनी :- अंतर्गत दहेगाव शिवार सदाशिव गोमासे यांचे शेताजवळ दिनांक १६/०५/२०२३ मे ०८/२० वा. ते ०९/१० वा. पर्यंत पोलीस स्टेशन पारशिवनी येथील स्टाफ पेट्रोलिंग करीत असतांना दहेगाव शिवारात सदाशिव गोमासे यांचे शेताजवळ आरोपी नामे अंकुश नथ्थू बोंदरेवावणे वय २८ वर्षे, रा. दहेगाव (जोशी) ता. पारशिवनी हा त्याच्या ताब्यातील ०१) लाल रंगाचा महिंद्रा युवो ५७५ डी. आय. कंपनीचा ट्रॅक्टर मुंडा क्र. एम. एच. ४० / बी. ई- १६७५ किंमती अंदाजे ५,००,०००/- रू. ०२) एक लाल रंगाची ट्राली क्र. एम. एच. ४० / ए एम.- २५५७ किंमती अंदाजे १,५०,०००/- रू यामध्ये अवैधरित्या विनापरवाना रेती भरून चोरटी वाहतूक करतांना मिळून आल्याने त्याचे ताब्यातील अंदाजे एक ब्रास रेती किंमती अंदाजे ५०००/- रू असा एकूण वाहनासह किंमती ६,५५,०००/- रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणी सरकार तर्फे रूपेश तुकाराम राठोड व नं. ८९४ पोस्टे पारशिवनी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे.पारशिवनी येथे आरोपीविरुद्ध कलम ३७९ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीला सूचनापत्रावर रिहा करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक मुंडे हे करीत आहे.