टेकाटी बॉयपास वळणावर ट्रक ची दुचाकी ला जोरदार धडक, दोघाचा मुत्यु एक गंभीर

संदीप कांबळे,कामठी

अपघातात दुचाकी चालक व लहान मुलाचा मुत्यु तर पत्नी गंभीर जख्मी.

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी फाट्या जवळील महामार्ग नागपुर बयपास वळणावक एका कोळश्याचा ट्रक ने दुचाकी बाहनास जोरदार धडक मारल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा व त्याच्या सहा महिच्या चिमुकल्याचा मुत्यु झाला तर पत्नी गंभीर जख्मी असल्याने नागपुर येथे उपचार सुरू असुन प्रकृती गंभीर असल्याचे बोलल्या जात आहे.
सुत्रा कडुन प्राप्त माहिती नुसार सोमवार (दि. २) मे ला भर उन्हात दुपार च्या सुमारास दुचाकी वाहन बजाज कँलिबर मोटर सायकल क्र एम एच ३४ पी ८३४३ चा चालक हा नागपुर वरून जबलपुर राष्ट्रीय महामार्गाने मनसर कडे जात असतांना टेकाडी फाट्या जवळील महामार्ग नागपुर बॉयपास च्या वळणावर एका कोळसा भरलेल्या ट्रक क्र एम एच ४० वाय ९४९८ च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भर धाव वेगाने व निष्काळजी पणाने चालवुन दुचाकी वाह ना ला ज़ोरदार धडक मारल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक शैलेश माखनलाल चौधरी वय ३० वर्ष राह. समता नगर जरीपटका नागपुर व त्याच्या सहा माहिन्याच्या चिमुकल्या मुलालाचा घटना स्थळीच मृत्यु झाला असुन पत्नी मिना शैलेश चौधरी वय २५ वर्ष ही गंभीर जख्मी असल्याने नागपुर येथे दाखल करण्यात आले असुन तिची सुध्दा प्रकृती गंभीर असल्याचे बोलल्या जात आहे. सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करून गंभीर अवस्थेत असलेल्या महिलेला पुढील उपचाराकरिता जवाहरलाल नेहरू चिकित्सालय कांद्री येथे भर्ती करण्यात आले असुन महिलेला जख्म अधिक असल्याने नागपुर येथे हलवि ण्यात आले. असून मृत्यु झालेल्या दोघांना शवविच्छेद ना करिता कामठी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवि ण्यात आले. घटनेचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन पोलिस निरिक्षक विलास काळ यांचे मार्गदर्शनात पो हवा गणेश पाल करीत आहे .

Next Post

विदर्भातील मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीसाठी विशेष योजना -दिलीप पांढरपट्टे

Tue May 3 , 2022
          दोन वर्षेपूर्तीनिमित्त आयोजित प्रदर्शनाला भेट           गडचिरोली येथे स्वतंत्र जलसंधारण कार्यालय           वडसा येथे उपविभागीय कार्यालय           जलसंधारणासाठी प्रथमच चार हजार कोटींची तरतूद               नागपूर  : जलसंधारणाच्या योजनांच्या प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणीला शासनाने प्राधान्य दिले असून त्यासाठी चार हजार कोटी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com