गुजरात विजय हा २०२४ लोकसभा निवडणुकीतील मोदीच्या विजयाचा पाया : ॲड. धर्मपाल मेश्राम

नागपूर :- गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेला अद्वितीय विजय हा देशाचे दिशादर्शक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील २०२४च्या लोकसभा निवडणुकीतील विजयाचा पाया आहे, अशी प्रतिक्रीया भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली आहे.

गुजरात राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एकहाती सत्ता मिळवित विजयाच्या परंपरेत नवा इतिहास रचला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात संविधानाला अनुसरून देशाची सुरू असलेली वाटचाल, देशात सुरू असलेले जनहिताचे कार्ये, यामुळेच जनतेने आपल्या मतांच्या रुपात देशाच्या विकासाला नवी देण्याच्या उद्देशाने ही विजयाची भेट दिली आहे.

गुजरातमधील हा विजय २०२४ मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा सत्ता स्थापनेच्या दृष्टीने सुरू असलेल्या वाटचालीचा पाया आहे, असेही ॲड. मेश्राम म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कार-दुचाकी ची धडक दोघे जखमी

Fri Dec 9 , 2022
– चोरबाहुली जवळील उड्डानपुलावरील घटना रामटेक :-  नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील चोरबाहुली-पवनी मध्यमार्गात असलेल्या उडानपुलावर एका धावत्या कारला मागेहुन दुचाकीने दिलेल्या धडकेत दुचाकी चालकासहित मागे बसलेले व्यक्ती जखमी झाले. प्राप्त माहितीनुसार गुरुवार दिनांक 8 डिसेंम्बर ला (सकाळी 9.30) वाजताच्या सुमारास ही दोन्ही वाहने पवनी कडून मनसरकडे येत होते. चोरबाहुली शिवारात एकाच मार्गाने येणाऱ्या दुचाकी चालक बालक ईश्वर भागडकर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com