विदर्भस्तरीय वृत्तपत्र विक्रेत्यांची सभा संपन्न

यवतमाळ :- महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना व यवतमाळ जिल्हा वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी संस्था यांच्या द्वारा विदर्भस्तरीय वृत्तपत्र विक्रेत्यांचे सभा २८ एप्रिल 2024 ला ट्युलिप गार्डन यवतमाळ येथे संपन्न झाली.

यावेळी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर सभेच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार, उपाध्यक्ष संतोष शिरभाते, दिनेश ओके, संघटन सचिव विनोद पन्नासे व सदस्य किशोर बेदरकर, प्रकाश आमले, बंडू मुळे व विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे अध्यक्ष सचिव यांचे यांनी उपस्थिती दर्शवली.

या बैठकीत विदर्भातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या समस्या पुरवणी भरणावळ कॅलेंडरबाबत तसेच सुट्टीबाबत नियमितिक सुट्टीबाबत व इतर विषयावर सखोल चर्चा करून निर्णय घेण्यात आला की सर्व वृत्तपत्र व्यवस्थापनास याबाबत पत्रव्यवहार करून कळविणे यावर एकमत झाले. विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात महागाईचा तसेच व्यवसायात मुलें न मिळण्याच्या समस्या आहे. त्यावर उपाय शोधण्याकरिता सखोल चर्चा करण्यात आली. सभेचे संचालन किरण कोरडे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजू हनवते यांनी मांडले. बैठक यशस्वी करण्याकरिता अध्यक्ष अशोक शिंदे, श्रीराम खत्री, राजू भलावी, मदन केळापुरे, तुषार गुजलवार, सचिन कदम, प्रवीण आगलावे यांनी परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर जिल्हा महानगरपालिका कामगार संघटनेद्वारे कामगार दिन साजरा

Wed May 1 , 2024
नागपूर :- नागपूर जिल्हा महानगरपालिका कामगार संघटनेद्वारे बुधवार १ मे रोजी कामगार दिन साजरा करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांच्या मार्गदर्शनात पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या कार्यालयात स्वतंत्र भारताचे पहिले कामगार मंत्री भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी लोकेश मेश्राम, विक्रम डुंबरे, राम सामंत, आशिष पाटील, मंगेश गोस्वामी, शंकर मेश्राम, शंकर नेवारे, सुनील रंगारी, मनीष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com