‘लोकराज्य निवडणूक विशेषांक’ माहितीपूर्ण आणि संग्रहणीय – एस.चोक्कलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी

मुंबई :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केलेला ‘उत्सव निवडणूकीचा अभिमान देशाचा’ हा लोकराज्यचा निवडणू्‌क विशेषांक माहितीपूर्ण आणि संग्रहणीय असल्याचे मत, प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी व्यक्त केले.

राज्यात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात होत असून या संपूर्ण प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगामार्फत करण्यात येत असलेली तयारी, मतदारांच्या सोयीसाठीच्या विविध ॲपची माहिती, त्याचसोबत आचारसंहिता बाबतची सविस्तर माहिती या अंकात देण्यात आली आहे. यासोबतच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची विश्वासार्हता, स्वीप उपक्रम, यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीतील आकडेवारी अभ्यासक,पत्रकार वाचकांच्या सुलभ संदर्भासाठी या अंकात उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

तसेच वाचकांसाठी हा विशेषांक  dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच महासंचालनालयाच्या महासंवाद या ब्लॉग समाजमाध्यमावर ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खरसोली येथे गुरु शिष्य मेळाव्याचे आयोजन आज

Wed May 1 , 2024
कामठी :- 1 मे रोजी महाराष्ट्र कामगार दिवस व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचे अवचित्य साधून महापुरुषांच्या विचारांचा लोकजागर व्हावा म्हणुन गुरु शिष्य जयंती मेळाव्याचे आयोजन 1 मे रोजी गट ग्राम पंचायत खरसोलीच्या पटांगणामध्ये दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रबोधनकार शाहीर पुरुषोत्तम खांडेकर रा. परसाड ता. कामठी यांचा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार टेकचंद सावरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षा जि.प. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com