विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने कळंबोली येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न

नवी मुंबई :- महाराष्ट्र दिनाच्या 64 व्या वर्धापनदिना निमित्त कोकणविभागाचे मुख्य ध्वजारोहण कोकण विभागीय महसूल आयुक्त पी.वेलरासू यांच्याहस्ते कळंबोली, नवी मुंबई येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात संपन्न झाले. उपस्थित मान्यवर, नागरिक आदींना आयुक्त पी.वेलरासू यांनी यावेळी वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या समारंभास नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, विभागीय अतिरिक्त आयुक्त विकास पासरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राज्य राखीव पोलीस दल, जलद प्रतिसादपथक, दंगल नियंत्रण पथक, नवी मुंबई पोलीस पथक, नवी मुंबई महिला पोलीस पथक, नवी मुंबई पोलीस वाहतूक शाखा पथक, सिडको अग्निशमन दल पथक, नवी मुंबई पोलीस बॅण्ड पथक, याशिवाय अतिथी निरीक्षण वाहन, नवी मुंबई पोलीस श्वान पथक, बुलेट ब्रुफ वाहन, आर.आय.व्ही. वाहन, वज्र वाहन, बीडीडीएस वाहन, वरूण वाहन, निर्भया पथक, फायर रेस्क्यू बाईक, रस्ता सुरक्षा अभियान पथक, अग्निशमन दल वाहन, आदिंनी संचलनाव्दारे प्रमुख अतिथी पी.वेलरासू यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

या कार्यक्रमास उपायुक्त (महसूल) विवेक गायकवाड, उपायुक्त (सामान्य) अमोल यादव, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, उपायुक्त(पुरवठा) लिलाधर दुफारे, उपायुक्त (नियोजन) प्रमोद केंभावी, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, वरिष्ठ पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंती निमित्त मनपाची आदरांजली

Wed May 1 , 2024
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने “या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे” अश्या अनेक स्फूर्ती गीताच्या माध्यमातून देशाला एकात्मतेच्या सुत्रात बांधणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जयंती निमित्त तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी उपायुक्त प्रकाश वराडे सहा. आयुक्त महेश धामेचा, अति. वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com