राजधानीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नवी दिल्ली :- महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 64 वा वर्धापन दिवस राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. उभय महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त रूपिंदरसिंग यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले.

कस्तुरबा गांधी मार्गस्थित आणि काॅपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात ध्वजारोहण झाले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रगीता सोबत राज्य गीत ‘गर्जा महाराष्ट्र माझा…’ गाऊन ध्वजवंदन केले.

या कार्यक्रमास अपर निवासी आयुक्त डॉ. नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, श्रीमती स्मिता शेलार व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक, महाराष्ट्र सदनात निवासी असणारे अभ्यागंत, दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी आणि दिल्लीत विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्र विविध प्रथा, परंपरांनी नटलेले समृद्ध राज्य - संजय राठोड

Wed May 1 , 2024
– महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहन यवतमाळ :- महाराष्ट्र विविध प्रथा, परंपरांनी नटलेले समृद्ध राज्य आहे. येथील साहित्य, संस्कृती, कला, संगीत, समृध्द गडकिल्ले महाराष्ट्राचे वैभव आहे. अशा राज्यात आपण वास्तव्य करतो, ही आपल्यासाठी देखील गौरवाची बाब आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील समता मैदान (पोस्टल ग्राऊंड) येथे पालकमंत्र्यांच्याहस्ते मुख्य ध्वजारोहन झाले. त्यावेळी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com