अतिरिक्त सुरक्षा ठेव नियमानुसारच; भरणा करण्याचे महावितरणकडून वीज ग्राहकांना आवाहन 

नागपूर :- महावितरणच्या नागपूर परिमंडलातील वीजग्राहकांना एप्रिल अथवा मे महिन्यात वीजबिलांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. ही अतिरिक्त सुरक्षा ठेव नियमानुसार असून त्याचा वीज ग्राहकांनी भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता-2021 च्या विनियम 13.1 नुसार वीजग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारण्यात येते. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते. त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील विनियम 13.11 नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर रिझर्व्ह बँकेच्या प्रचलित दरानुसार व्याजाची रक्कम (एप्रिल 2023 ते मार्च 2024 साठी व्याजाचा दर 6.75 टक्के आहे) वीजबिलाद्वारे समायोजित करून वीजग्राहकांना अदा करण्यात येते.

लघुदाब वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम घरबसल्या भरण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर व महावितरणच्या मोबाईल अॅपवर सुविधा उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या बिलाची रक्कम भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

ग्राहकांच्या सरासरी वीजवापराच्या आधारे अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. वीजग्राहकांना सुरक्षा ठेव ही मासिक बिल असेल, तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद आयोगाकडून करण्यात आली आहे. उदा. एका ग्राहकाचा एकूण वार्षिक वीज वापर 6000 रुपये असेल. तर या ग्राहकाने सरासरीनुसार दोन महिन्याचे बिल म्हणजेच 1000 रुपये सुरक्षा ठेवीपोटी महावितरणकडे भरणे बंधनकारक आहे. त्यानंतरच्या आर्थिक वर्षात या ग्राहकाचा वार्षिक वीज वापर 7200 रुपये झाल्यास ठरलेल्या सूत्रानुसार व सरासरीप्रमाणे सुरक्षा ठेवीची रक्कम 1200 रुपये होईल. संबंधित ग्राहकाचे 1000 रुपये पूर्वी जमा असल्याने त्याला सुरक्षा ठेवीपोटी वीज कंपनीकडे फक्त 200 रुपये अतिरिक्त भरावे लागतील. सुरक्षा ठेवीच्या अतिरिक्त रकमेचा भरणा करण्यासाठी नियमित वीज बिलाशिवाय स्वतंत्र बिल ग्राहकाला दिले जाते.

महावितरणकडे जमा असलेली सुरक्षा ठेव ही ग्राहकांचीच रक्कम असून वीज पुरवठा कायमस्वरुपी बंद करतेवेळी ही ठेव ग्राहकाला व्याजासह परत केल्या जाते. मुळात वीज ग्राहकांकडून घेण्यात येत असलेली सुरक्षा ठेव ही ग्राहकांच्याच कल्याणासाठी महावितरणतर्फ़े वापरल्या जाते, ग्राहकांना मिळणारे वीजेचे बील हे त्यांचा एक महिना आधी वापरलेल्या वीजेपोटी असते, म्हणजेच आधी वापर व त्यानंतर बील असा हा क्रम आहे. वीज बिल आल्यानंतरच ग्राहक ते भरत असतो. म्हणजेच वीज बिल आल्यानंतर ते भरण्यासाठी साधारणत: 18 ते 21 दिवसांचा कालावधी ग्राहकाकडे असतो. म्हणजे वितरीत केलेल्या विजेचे पैसे महावितरणकडे सुमारे दीड महिन्यानंतर येतात. अश्या परिस्थितीत वीज वितरण कंपनीचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी वीज कायदा 2003 च्या कलम 47 च्या उपकलम (5) व उपकलम (1) अन्वये सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांना वितरण कंपनीकडे सुरक्षा ठेव जमा करने बंधनकारक आहे. ग्राहकाला आर्थिक वर्षातील दोन महिन्याच्या सरासरी इतके वीजबिल सुरक्षा ठेव म्हणून वितरण कंपनी कडे जमा करावी लागते. त्यामुळे ग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा वेळीच भरणा करुन सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.

– उपमुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, नागपूर

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वेकोलि में राजभाषा हिन्दी के प्रयोग का कोयला मंत्रालय द्वारा निरीक्षण

Wed May 1 , 2024
नागपूर :-दिनांक 30.04.2024 को भारत सरकार, कोयला मंत्रालय के राजभाषा विभाग से सहायक निदेशक (राजभाषा) विशाल तथा वरिष्ठ अनुवाद अधिकारी मीनाक्षी कटारिया ने वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (वेकोलि) में राजभाषा हिन्दी के प्रयोग का निरीक्षण किया। निरीक्षण के दौरान विशाल के साथ वेकोलि के निदेशक तकनीकी (संचालन / योजना एवं परियोजना) ए. के. सिंह तथा निदेशक (वित्त) बिक्रम घोष विशेष तौर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com