राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंती निमित्त मनपाची आदरांजली

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने “या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे” अश्या अनेक स्फूर्ती गीताच्या माध्यमातून देशाला एकात्मतेच्या सुत्रात बांधणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जयंती निमित्त तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी उपायुक्त प्रकाश वराडे सहा. आयुक्त महेश धामेचा, अति. वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी, अमोल तपासे, कैलाश लांडे, विनोद डोंगरे उपस्थित होते. तसेच मानेवाडा चौकातील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळयाला आमदार प्रविण दटके यांनी माल्यार्पण करुन आदरांजली अर्पण केली. या वेळी सहा. आयुक्त नरेंद्र बावणकर व मोठया संख्येने गुरुदेव सेवामंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘लोकराज्य निवडणूक विशेषांक’ माहितीपूर्ण आणि संग्रहणीय - एस.चोक्कलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी

Wed May 1 , 2024
मुंबई :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केलेला ‘उत्सव निवडणूकीचा अभिमान देशाचा’ हा लोकराज्यचा निवडणू्‌क विशेषांक माहितीपूर्ण आणि संग्रहणीय असल्याचे मत, प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी व्यक्त केले. राज्यात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात होत असून या संपूर्ण प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगामार्फत करण्यात येत असलेली तयारी, मतदारांच्या सोयीसाठीच्या विविध ॲपची माहिती, त्याचसोबत आचारसंहिता बाबतची सविस्तर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com