लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांची ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून लातूरच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांची ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ लातूर जिल्हा प्रशासन सज्ज’ या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत बुधवार १ मे आणि गुरुवार २ मे २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरुन तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवरुन सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित करण्यात येणार आहे. लातूरच्या जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यात निवडणुकीचे कामकाज सुरळित होण्यासाठी पाडण्यासाठी सुरु असलेली कार्यवाही, मतदान केंद्रे व मतमोजणी केंद्रावर करण्यात आलेली तयारी मतदार जनजागृती कायदा व सुव्यवस्थेचे नियोजन, मतदारांसाठी सोयीसुविधा आदींबाबत श्रीमती ठाकूर – घुगे यांनी माहिती दिली आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार १ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता महासंचालनालयाच्या समाज माध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे.

महासंचालनालयाच्या समाज माध्यमांच्या लिंक

एक्स- https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यूट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

समृद्ध महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प घेवूया - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Wed May 1 , 2024
– महाराष्ट्रदिनी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण नागपूर :- महाराष्ट्राने देशाच्या विकासात सामाजिक सुधारणांचा भक्कम पाया रोवला आहे. राज्याने औद्योगिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले आहे तसेच विविध क्षेत्रात राज्याने प्रगतीचे मानके साध्य केले आहे. महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने आपण सिंहावलोकन करून समृद्ध राज्य घडवण्याचा संकल्प करुया, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. येथील कस्तुरचंद पार्क मैदानावर आयोजित महाराष्ट्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com