अट्टल घरफोडी करणाऱ्या आरोपीस अटक, एकुण ९ गुन्हे उघडकीस, किंमती ३,९४,१८६/- रू चा मुद्देमाल जप्त

नागपूर :- पोलीस ठाणे अंबाझरी हद्दीत, पॉट नं. २४, हिलटॉप, नागपूर येथे राजेश बोदले, यांचे घराचे बांधकाम सुरू होते. अज्ञात आरोपीने त्यांचे घराचे दुसऱ्या माळयावरील एका रूम मधुन वेगवेगळया एमएमचे एकुण १४ वायर बंडल किंमती ८१,६००/- रूचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला. फिर्यादी उमेश नामदेवराव डोंगरे वय ४२ वर्ष रा. प्लॉट नं. ४५, आदर्श नगर, वाडी, नागपूर चांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे अंबाझरी येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३८० भा.दं.वी अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट क. ३ चे अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदारा मार्फतीने मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, तसेच तांत्रीक तपास करून गुन्हयातील आरोपी, अट्टल घरफोडी करणारा गुन्हेगार योगेश उर्फ लक्को रमेश शाहु वय २५ वर्ग रा. काशीबाई देऊळ जवळ, कोतवाली, नागपूर यास सापळा रचुन ताब्यात घेतले. आरोपीस विचारपूस केली असता त्याने वर नमुद घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याने ताब्यातुन गुन्हयातील चोरी केलेले वायर बंडल किंमती ६१,६००/- रू चे, एक मोबाईल फोन व गुन्हयात वापरलेले वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला, आरोपीची अधिक सखोल चौकशी केली असता त्याने त्याचा साथिदार पाहिजे आरोपी नामे शुभम उर्फ पांडया अरूण ठाकरे वय २५ वर्ष रा. यवतमाळ याचे मदतीने पोलीस ठाणे जरीपटका व कपिलनगर हद्दीतुन अशाच प्रकारची एक घरफोडी कल्याची कबुली दिली. तसेच पोलीस ठाणे बजाजनगर हद्दीत एक व धंतोली हद्दीत पाहिजे आरोपी नामे चंदाबाई तुकाराम देवगडे रा. मटकीपूरा, ईमामवाडा, नागपूर व भारत नगर चौकातील कबाडी दुकानदार राकेश शाहु यांचेसह मिळुन घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपीने त्याचा साथिदार पाहिजे आरोपी नामे अमोल तुकाराम देवगडे रा. मणिकपुरा हॉस्पीटल मागे, मटकीपूरा, ईमामवाडा, नागपूर याचे सोबत संगणमत करून पोलीस ठाणे बेलतरोडी हद्दीत एक व पोलीस ठाणे अजनी हद्दीत तिन ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपी हा अट्टल गुन्हेगार असुन त्याचेवर नागपूर शहरात जवळपास ८० चे वर घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहे. गुन्हेशाखा युनिट क. ३ यांनी आरोपी अटक करून एकूण ९ गुन्हे उघडकीस आणुन गुन्हयातील एकुण मुद्देमाल किंमती ३,९४,१८६/- रू वा जप्त केला आहे. आरोपीस पुढील तपासकामी मुद्देमालासह अंबाझरी पोलीसांचे ताब्यात दिले आहे. तसेच पाहीजे आरोपीचा शोध सुरू आहे.

वरील कामगिरी पोलीस आयुक्त नागपूर शहर, सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, अपर पोलीस आयुक्त नागपूर शहर,  पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), मा. सहायक पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांचे मार्गदर्शनाखाली पोनि मुकुंद ठाकरे, पोउपनि नवनाथ देवकाते, सफौ, ईश्वर खोरडे, मिलींद चौधरी, पोहवा, मुकेश राउत,प्रविण लाडे, अमोल जासुद, अनुप तायवाडे, विनोद गायकवाड, नापोअं, संतोष चौधरी पोअं. मनिष रामटेके व अनिल बोटरे यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आय.पी.एल. क्रिकेट मॅचवर सट्टा खायवळी करणारे तीन आरोपी ताब्यात, एकूण १४,४६,२००/- रू चा मुद्देमाल जप्त

Wed May 1 , 2024
नागपूर :- लकडगंज पोलीसांचे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोलीस ठाणे हद्दीत बि.टी.पी हॉटेल, सतनामी नगर,लकडगंज, नागपूर येथे आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा सुरू आहे अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, नमुद घटनास्थळी गेले असता, तेथे आरोपी क. १) अजय विजय सोनी, वय ३० वर्षे, रा. १३४, गणेश डेअरी जवळ, कोरवा, छत्तीसगढ २) विनय निलकमल वर्मा, वय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com