भाजप स्वार्थासाठी तर विकास फाउंडेशन जनतेच्या सेवेसाठी :- माजी आमदार चरण वाघमारे

नितीन लिल्हारे

मोहाडी : भंडारा जिल्ह्यात जे वातावरण राजकारणात घडवून आणले ते प्रत्यक्ष लोकांनी जवळून पाहिले आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये दोन गटात मागील अनेक वर्षांपासून राजकारण
गडूळ झाले असल्याचे चित्र सर्वांना दिसून आले होते. भाजपचे नेते कितीही फुकट बोंबा मारत असले तरी त्यात तथ्य नाही, भाजप नेत्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांचा पक्ष नाही, खरं म्हणजे भाजप स्वार्थासाठी तर विकास फाउंडेशन जनतेच्या सेवेसाठी कार्य करीत असल्याचे आरोप भाजपामधून चुक नसतांना दोनदा पार्टीतून निष्कासीत झालेले माजी आमदारचरण वाघमारे यांनी घणाघाती आरोप केला आहे.

जिल्ह्याचे राजकारण गडूळ करण्यामागे याला कारणीभूत म्हणून नागपुरचे पार्सल आमदार फरीणय फ़ुके हे असल्याचे कार्यकर्त्यांनी
तुमसर तालुका विकास फाउंडेशन कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
येणारी महत्वाची तुमसर नगरपरिषद निवडणूक तोंडावर असल्याने
निवडणूक कशी जिंकता येईल. यासाठी विकास फाउंडेशने दिवसरात्र एक करत असल्याचे अग्रेसर भवन तुमसर येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात दिसून आला.

भंडारा जिल्हा परिषद मध्ये भाजपा-राष्ट्रवादी तर काँग्रेस- विकास फाउंडेशनची युती पाहायला मिळाली. ही युती काही लोकांना मान्य नसतांना देशाचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चुपी युती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी आमदार चरण वाघमारे यांनी हाणून पाडली. आणि जिल्हा परिषदेवर काँग्रेस- विकास फाउंडेशन युती करून आपला झेंडा रोहला.

काही नेते सिहांसनावर बसण्याची मोठे नेते काही करू शकतात हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून दिसून आले आहे. कार्यकर्ते पक्षश्रेष्ठीसाठी गावात भांडणे करतात आणि मोठे नेते एकमेकाला मांडीला मांडी लावून बसतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कधी पर्यत गावात भांडणे करत राहावे? असा प्रश्नन आता झालेल्या जिल्हा परिषदच्या चुपी युती केल्यावरून कार्यकर्त्यांना प्रश्नन पडला आहे.
जिल्ह्यातून भाजप व नागपूरचे पार्सल परिणय फ़ुके यांना हद्दपार केल्याशिवाय जिल्ह्याचा विकास शक्य नाही. भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनिल मेंढे यांनी क्षेत्रात विकास कामे केले नसल्यामुळे आपला भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्र दहा वर्षे
मागे गेला आहे.
त्यामुळे भंडारा जिल्ह्यात भाजपात नेतृत्व करणारा सक्षम नेता उरला नाही. असा टोलानवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य
बंडू बनकर, दिलीप सार्वे यांनी विकास फाउंडेशन कार्यकर्ता मेळाव्यात लगावला आहे.

हिंमत असेल तर परिणय फुकेनी माझ्या वर ईडी लावावी. मी ढेकेदारी केली नाही व परसेन्ट कोणालाही मागितले नाही. माझे शाळा -कॉलेज नाही.आमदार परिणय फुके, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मला निष्कासीत करण्याचा हा डाव खेळल्याचा आरोप
तुमसर येथे झालेल्या तालुका विकास फाउंडेशन कार्यकर्ता मेळाव्यात विकास फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी केला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप ताले,विकास फाउंडेशन कार्याध्यक्ष युवराज जमाईवार, तुमसर बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे, जि.प. सभापती राजेश सेलोकर, तुमसरचे सभापती नंदू रहांगडाले, उपसभापती हिरालाल नागपुरे, मोहाडी उपसभापती बबलू मलेवार,जि. प.सदस्य बंडू बनकर, जि. प. सदस्य दिलीप सार्वे, सौ.धुरपता मेहर, माजी नगरसेवक मेहताबसिंग ठाकूर,प.स.सदस्य पल्लवी कटरे, प.स.सदस्या सुशीला पटले, प.स. सदस्या सलोनी भोंडे, प.स.सदस्या निशा उईके, प.स.सदस्य राजेश ठाकूर, प.स.सदस्यविवेक रहांगडाले, देवानंद लंजे,योगेराज टेम्बरे, सतीश चौधरी, अशोक पटले, देवसिंग सव्वालाखे,अनिल जीपकाटे, प्रकाश पुडके, परमानंद कटरे, हिरालाल रोखडे,रीना मते, राजकुमारी लिल्हारे, गौरव नवलखेले, बालचंद पाटिल व मोठ्या संख्येने विकास फाउंडेशन कार्यकर्ते उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विवाह पत्रिकांचे ट्रेंड होताहेत जुने

Sun May 29 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी आता लग्नाचे निमंत्रण डिजिटल कार्ड पद्धतीने कामठी ता प्र 30:-जीमागील दोन वर्षांपूर्वी कोरोना प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या निर्बंधाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला असून मागील वर्षी बरेच लग्नसोहळे रद्द झाल्याने आणि मर्यादित वऱ्हाडी उपस्थित राहण्याच्या निर्बंधांमुळे यंदा लग्नपत्रिका छपाईत घट झाल्याचे दिसून येत असून आता मोबाईलच्या माध्यमातूनच जास्तीत जास्त पत्रिका पाठविल्या जात आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com