कुलरच्या विद्दूत धक्क्याने वारेगाव च्या 17 वर्षीय मुलाचा मृत्यू

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी तालुक्यातील वारेगाव रहिवासी 17 वर्षीय मुलाचा त्याच्या घराशेजारील घरात गेले असता त्या घरातील कुलरच्या विद्दूत धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना गतरात्री 10 दरम्यान घडली असून मृतक मुलाचे नाव योगेश गुंनीलाल कागदीमेश्राम वय 17 वर्षे रा वारेगाव असे आहे.

सदर घटना घडताच उपचारार्थ आशा हॉस्पिटल येथे हलविण्यात आले.मात्र उपचारा दरम्यान सदर मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.सदर मृतक मुलाच्या पार्थिवावर उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे शवविच्छेदन करण्यात आले.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.सदर मृतकाच्या पाठीमागे आई,वडील व एक बहीण असा आप्तपरिवार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

332 ग्राम गांजा जप्त

Mon Apr 1 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी रोड वरील मराठा दरबार हॉटेल समोर एका संशयित तरुणाच्या पिशवीची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 6 हजार 640 रुपये किमतीचा 332 ग्राम जप्त करण्यात आला तसेच एक दुचाकी व एक मोबाईल असा एकूण 27 हजार 640 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अटक आरोपीचे नाव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com