नागपूर :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष निधीतून माजी महापौर संदीप जोशी यांच्या प्रयत्नाने लक्ष्मीनगर मधील मंजूर सिमेंट रस्त्यांच्या कामाचे शनिवारी (ता.10) मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन झाले.
सायंटिफिक सोसायटीचे अध्यक्ष विजय गडकरी, श्री सिद्ध हनुमान मंदिराचे सचिव शेखर कपले, वासुदेव अत्रे यांनी कुदळ मारून विविध सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन केले. याप्रसंगी माजी महापौर संदीप जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
भूमिपूजन समारंभाला मनोज देशपांडे, जयंत आदमने, अमोल वटक, राजीव रोडी, उदय देशकर, राजेश वाघमारे, राजाभाऊ ठकनाईक, हेमंत सहस्रबुद्धे, मनोज फणसे, अर्चना शृंगारपुरे, कीर्ती पुराणिक, योगिता धार्मिक, जितू जोशी, चिखलकर, आशिष गुप्ता आदी प्रामुख्याने उपस्थित होते.