रामटेक :- फिर्यादी नामे अश्विनी अर्जुन वैद्य, वय ३० वर्ष रा. साटक, ता. पारश्विनी, रामटेक हिचा पती जखमी नामे अर्जुन श्रीराम वैद्य, वय ४५ वर्ष व आरोपी क्र. ०१) चिरकुट लक्ष्मण चंदेल ०२) संजय चिरकुट चंदेल दोन्ही रा. साटक, ता. पारशिवनी, रामटेक हे एकाच गावातील रहीवासी असुन एकमेकांना ओळखतात. गावातून फिर्यादीचे पती दुकानाकडे पायी येत होते व त्यांचा मागेमागे चिरकुट लक्ष्मण चंदेल जुन्या भांडणाचे कारणावरून शिवीगाळ करत येत होता व तुला जिवाने ठार मारतो असे म्हणून तेथील दुकाणातील स्टूल फिर्यादीच्या पतीच्या चेहऱ्यावर मारला त्यामुळे फिर्यादीचे पती रोडवर खाली पडून वेशुध्द झाले व फिर्यादीचे पतीच्या नाकातोंडातून रक्त निघत होते. फिर्यादीने आरोपीस हटकले असता आरोपी क्र. ०१ व ०२ हयांनी फिर्यादीला व तिच्या मुलाला शिवीगाळ करून जिवाने मारण्याची धमकी दिली. अशा फिर्यादीच्या तोंडी रीपोर्ट वरून पोस्टे रामटेक येथे अप क्र. ५५६/२४ कलम १०९, ३५१ (३) ३५२ ३(३) भा.न्या. स. २०२३ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशनला मिळताच आरोपीच्या शोधकामी पथक तयार केले. सदर गुन्हयात आरोपींचा शोध रामटेक पोलीस पथक करीत असताना दिनांक ०८/०८/२०२४ रोजी पथकास सदर आरोपी आपल्या घरी असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यावरून पथकाने आरोपी नामे- ०१) चिरकुट लक्ष्मण चंदेल, वय ६४ वर्ष ०२) संजय चिरकुट चंदेल, वय ४४ वर्ष दोन्ही रा. साटक, ता. पारशिवनी, रामटेक यांना साटक येथील त्यांचे राहते घरून ताब्यात घेवुन पुढील कार्यवाही करीता पोस्टे येथे आणले.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे रामटेक येथील ठाणेदार पोनि प्रशांत काळे, सपोनि मनोज खडसे नापोशि गोपाल डोकीरमारे, संदीप धुर्वे, पोशि मनोज लांजेवार, रूपेश राठोड, रामप्रसाद भलावी यांनी पार पाडली.