सईद नगर येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सईद नगर रहिवासी विवाहित इसमाने घरी कुणी नसल्याचे संधी साधून अज्ञात कारणावरून आपल्या राहत्या घरातील खोलीत पंख्याला रस्सी बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गतरात्री 1 दरम्यान घडली असुन मृतक इसमाचे नाव जुबेर शेख मजर शेख वय 36 वर्षे रा सईद नगर कामठी असे आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी शवविच्छेदनार्थ मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात हलविण्यात आले आहे.आत्महत्येचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पिल्ले करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सरकारने हलबांचा केलेल्या विश्वासघात विरोधात संविधान चौकात भव्य धरणे आंदोलन

Sun Feb 11 , 2024
– आता सरकारने हलबांचा अंत पाहू नये अन्यथा निवडणुकीत परिणाम दिसेल – आदिम नेत्या ॲड.नंदा पराते  नागपूर :-आदिम हलबा ,हलबी जमातीच्या विविध मागण्यांना घेऊन राष्ट्रीय आदिम कृति समितीने दिनांक १८ डिसेंबर २०२३ रोजी विधानसभेवर पुकारलेल्या मोर्चात लाखोंच्या संख्येत हलबा बांधव सामील झाले. शिंदे-फडणवीस सरकार न्याय मागण्या पूर्ण करीत नसल्याने आदिम हलबा,हलबी आदिवासींचा असंतोष दाखविण्यासाठी राष्ट्रीय आदिम कृति समितीच्या माध्यमाने संविधान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com