वाडीत कचरा संकलन केंद्राला लागली आग,! सुदैवाने जीवितहानी टळली

वाडी :- वाडी नगर परिषद अंतर्गत असलेल्या डॉ.आंबेडकर नगरच्या मागच्या बाजूने सुका कचरा संकलन केंद्रात दुपारच्या वेळी अचानक आग लागली, सुदैवाने थोडक्यात जीवितहानी टळली.

वाडी नप.अंतर्गत ओला कचरा व सुका कचऱ्यावर प्रक्रिया करणारे दोन केंद्र आहेत, त्यापैकी सुका कचरा संकलन केंद्रात केंद्रातील कामगार काम करीत असतांना काल दुपारच्या वेळी दोन ते अडीच वाजताचे दरम्यान अचानक आग लागली.सुदैवाने प्रवीण गोमासे या घंटागाडी वाहन चालकाला कचऱ्यातुन धूर निघत असल्याचे लक्षात येताच त्याने इतर कामगारांचे काम थांबवून आग विझविण्यासाठी प्रयन्त केले पण हवेमुळे आग अधिकच भडकली.लागलीच नप.प्रशासनास माहिती देण्यात आली.तोपर्यंत संपूर्ण परिसरात आगीने जोर पकडला होता. दरम्यान वाडी नप.अग्निशमन दलाची व नंतर मनपा अग्निशमन दलाचे वाहन पोहचून जवानांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी वाडी नप. मुख्याधिकारी डॉ.विजय देशमुख यांनी तातडीने भेट देऊन संबंधित कचरा संकलन केंद्र संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांना या केंद्राचे ठिकाण व आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक ते बदल करण्याचे योग्य ते निर्देश दिले. या आधीही या केंद्राला आग लागली होती त्यामुळे डॉ.आंबेडकर नगर परिसरातील नागरिकानी कचरा केन्द्र हटविण्याची मागणी केली होती.यावेळी सुद्धा माजी नगरसेवक नरेंद्र मेंढे,आशिष नंदागवळी,बसपाचे सुधाकर सोनपिपळे,गौतम मेश्राम यांनी घटनास्थळी उपस्थित राहून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कचरा प्रक्रिया केंद्र हटविण्याची मागणी केली आहे.पाणी पुरवठा अभियंता सुषमा भालेकर,स्वच्छता निरीक्षक धनंजय गोतमारे, मुकेश महातो,ज्येष्ठ लिपिक योगेश जहागीरदार,पिंकेश चकोले इ.आग विझेपर्यंत परिस्थितीवर लक्ष ठेवून होते

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com