जबरी चोरी करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल 

खापरखेडा :- अंतर्गत ०८ किमी अंतरावर किल्ले कोलार अंतरावरील मौजा नांदा कोराडी शिवार कामठी येथे दिनांक २२/०५/२०२३ से सायंकाळी ०६.०० वा. दरम्यान फिर्यादी नामे श्रृष्टी महेंद्रकुमार बावणे वय २४ वर्ष, रा. प्लॉट नं. ५३ गोरखनाथ को ऑपरेटीव्ह हायसिंग सोसायटी बाबा फरीद नगर, गायत्री नगर एनआयटी गार्डन जवळ कोराडी रोड नागपूर ही तिचा मित्र नामे- प्रविण बोंडे रा. बेझनबाग याचे सोबत बाहेर जेवण करण्याकरीता तिची ओला. इलेक्ट्रीक गाडी क्र. एम.एच-३१ / एफ. डब्ल्यू- ७६८० ने पुनम वेवर्स येथून प्रविण यास घेवून नागपूर वरून दोघेही सावनेर रोडच्या फिरा रेस्टॉरंट येथे रात्री ०८.४५ वा. पोहाचले. तिथे त्यांनी जेवण केल्यानंतर रात्री ०९.४५ वा सुमारास दोघेही नागपूरला परत येण्याकरीता निघाले. एका मोपेड गाडीवर ३ अनोळखी इसमांनी येवुन त्यापैकी हेल्मेट घातलेल्या अनोळखी इसमाने फिर्यादी व प्रविणला त्यांचेजवळील बंदुकीचा धाक दाखवुन खाली बसण्यास सांगितले. त्यापैकी एकाने प्रविणचा गळा पकडला व दुसन्या इसमाने फिर्यादीचे हात पकडुन फिर्यादीला लज्जा वाटेल असे कृत्य करू लागला. फिर्यादीने त्यास विरोध केला. त्यांनी प्रविण यांचेकडे असलेले दोन्ही मोबाईल हिसकावून घेतले. फिर्यादीने विरोध केला असता इटापटीत त्यापैकी एका आरोपीने त्यांचेजवळील बंदुक काढुन प्रविणच्या दिशेने फायर केला त्यामुळे ती गोळी प्रविणच्या पायात लागली. तसेच फिर्यादीने डोक्यावर बंदुकीने मारून तिला जखमी करून प्रविण यांचे खिशात असलेला आय फोन किंमती अंदाजे ५०,०००/-रु. व ओपो रेनो मोबाईल किंमती अंदाजे २२,०००/- असा एकुण ७२,००० /- चा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून पळुन गेले.. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. खापरखेडा येथे आरोपीतांविरुध्द कलम ३९७, ३५४, ३५४ अ. ३५४ भादवि ३/२५ भारतीय हत्यार कायदा कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस स्टेशन खापरखेडा करीत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com