महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

मुंबई :- राज्यातील बहुचर्चित तलाठी परीक्षेतील उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र महसूल विभागाने तलाठी भरती २०२३ परिक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. जे उमेदवार भरती परीक्षेसाठी बसले होते ते mahabhumi.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट दऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. महाराष्ट्र तलाठ्यांची लेखी परीक्षा ३६ जिल्ह्यांमध्ये ५७ शिफ्टमध्ये पार पडली. १,०४१,७१३, नोंदणीकृत उमेदवारांपैकी ८६४,००० (८३.०३ %) परीक्षेत सहभागी झाले होते.२०२३ मधील महाराष्ट्र तलाठ्यांची जिल्हानिहाय गुणवत्ता यादी ५ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध झाली. निवड मंडळाने आता अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.

महाराष्ट्र तलाठी अंतिम निकाल २०२३ कसा तपासायचा?

महाराष्ट्र तलाठी भारती निकाल तपासण्यासाठी उमेदवार कसा पाहू शकतात.

स्टेप्स १ : mahabhumi.gov.in या महाराष्ट्र महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

स्टेप २: मुख्या पेजवर “तलाठी थेट सेवा भरती-२०२३ जिल्हानिहाय निवड यादी आणि प्रतीक्षा यादी” या लिंकवर क्लिक करा.

स्टेप ३. तुम्हाला एका नवीन पेज दिसेल तुम्ही जिथून परीक्षेसाठी अर्ज केला होता तो प्रदेश निवडा.

स्टेप ४. तलाठी थेट सेवा भरती-२०२३च्या निकालाची PDF स्क्रीनवर प्रदर्शित केली जाईल.

स्टेप ५: यादीमध्ये तुमचे नाव आणि रोल नंबर टाकून तपासा

स्टेप ६. डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी निकालाची प्रिंटआउट घ्या

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रपति कल 75वें गणतंत्र दिवस की पूर्व संध्या पर राष्ट्र को संबोधित करेंगी

Wed Jan 24 , 2024
नई दिल्ली :- राष्ट्रपति द्रौपदी मुर्मु कल (25 जनवरी, 2024) 75वें गणतंत्र दिवस की पूर्व संध्या पर राष्ट्र को संबोधित करेंगी। संबोधन 19.00 बजे प्रसारित किया जाएगा। आकाशवाणी के समस्त राष्ट्रीय नेटवर्क और दूरदर्शन के सभी चैनलों पर हिंदी और फिर अंग्रेजी में इसका प्रसारण किया जाएगा। दूरदर्शन पर हिंदी और अंग्रेजी में संबोधन के प्रसारण के बाद दूरदर्शन के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com