ग्रामपंचायत कर्मचारी युनियन च्या कामठी तालुकाध्यक्षपदी जॉनी वंजारी ची बिनविरोध निवड..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 19 : महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एनजीपी 4511 ची तालुकास्तरीय सभा नुकतीच कामठी पंचायत समिती सभागृहात घेण्यात आली.या सभेत युनियन चे प्रभारी अध्यक्ष जयदेवभाऊ आंतूलकर ,जिल्हा अध्यक्ष अशोक कुथे, जिल्हा सचिव ,विभागीय आयुक्त यांच्या मुख्य उपस्थितीत कामठी तालुका ग्रामपंचायत कर्मचारी युनियन ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली ज्यामध्ये कामठी तालुका ग्रा प कर्मचारी युनियन च्या कामठी तालुकाध्यक्षपदी येरखेडा ग्रा प चे कर्मचारी जॉनी वंजारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

जाहीर कार्यकारिणी नुसार अध्यक्षपदी जॉनी वंजारी, उपाध्यक्षपदी कैलास चौधरी, सचिवपदी रोशन अंजनकर, सहसचिव सुभाष चावके,कोषाध्यक्ष विष्णू देऊळकर, संघटक अमर इंगोळे, तर सदस्यपदी वैशाली भगत,भावना पैडुलवार, विशाल जनधारे, प्रवीण धुणे,हंसराज मेश्राम, भास्कर तानेक, चेतन झाडे, पुजाराम जार्वेकर ची नियुक्ती करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

युवा चेतना मंच तर्फे कामठी येथील विविध गणेशोत्सव मंडळ सम्मानित

Mon Sep 19 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 19 :- दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा युवा चेतना मंच तर्फे विविध सामाजिक उपक्रम व उत्कृष्ट सजावट करणाऱ्या गणेशोत्सव मडळांचा युवा चेतना मंच तर्फे दर वर्षी सम्मान करण्यात येतो . यावर्षी सुद्धा श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बजरंग पार्क , उपराश गणेशोत्सव मंडळ नया बाजार , ओम साई मित्र मंडळ संजय नगर, श्री अष्टविनायक मित्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com