संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- महाराष्ट्र शासनाने मराठा आंदोलनाचा धसका घेऊन कुठलाही विचार न करता अध्यादेश काढून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला असल्याने हा ओबीसी वरचा अन्याय आहे तेव्हा ओबीसी वरचा अन्याय सहन करणार नसून तो अद्यादेश परत घ्या अशी भावना माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले.
अलीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाने आंदोलनाचे हत्यार उपसले होते त्यांची आरक्षणाची मागणी योग्य असली तरी त्यांना ओबीसी समाजातून आरक्षण देण्यात येऊ नये.असे आमचे मत आहे परंतु मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव मुंबईत येताच शासनाने ओबीसी समाजातील बांधवांचा कुठलाही विचार न करता मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय अध्यादेश काढून घेण्यात आला.अप्रत्यक्षरीत्या ओबीसी समाजाची दिशाभूल करून ओबीसी समाजावर अन्याय केला आहे.हा अन्याय ओबीसी समाज सहन करणार नसून ओबीसी समाजासाठी शक्यतो रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे मत माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी व्यक्त केले आहे.
मराठा आरक्षणासाठी शासनाने सर्वेक्षण केले त्यातुन जातीनिहाय आकडेवारी समोर येणार आहे.सण 2011 पासून जनगणना झाली नसून या सर्वेक्षणाचा आधार घेऊन शासनाने ओबीसी समाजाच्या आरक्षणाची टक्केवारी वाढवावी असे मत व्यक्त केले.
मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा कुठलाही विरोध नसल्याचे सांगून मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये.