एस टी बस प्रवासी महिलेच्या बॅग मधून 2 लक्ष 48 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी बस स्थानकाहून नागपूर कडे एस टी बस ने प्रवास करीत असलेल्या महिलेच्या हॅन्ड बॅग मधून कुणीतरी अज्ञात चोरट्याने बॅग मध्ये सुरक्षित ठेवलेले 2 लक्ष 48 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना 18 डिसेंबर ला सायंकाळी 6 वाजता घडली असून यासंदर्भात फिर्यादी कमल मते वय 62 वर्षे रा हुडकेश्वर नागपूर ने नवीन कामठी पोलिस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 379 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सूरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर फिर्यादी ह्या कामठी ला दिराकडे असलेल्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी 13 डीसेंबरला परिवारासह कामठी ला आले होते. लग्न समारंभ संपताच 18 डीसेंबर ला सायंकाळी 6 वाजता पती व मुलीसह नागपूर ला स्वगृही जाण्यासाठी कामठी बस स्थानकाहुन रामटेक नागपूर बस क्र एम एच 14 बी टी 4663 ने प्रवास करून जात असता बस मध्ये गर्दी असल्याचे संधी साधून अज्ञात चोरट्याने संधी साधून फिर्यादी च्या बॅग मधून 2 लक्ष 48 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र,सोन्याची चपलकीटी,सोन्याची कानातील जोड,सोन्याचे नथ चोरून नेल्याची घटना नागपूर येथील गणेशपेठ बस स्थानकात निदर्शनास आली.सदर घटनेसंदर्भात कामठी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाई कि जान बचाने बहन दे रही है किडनी भाई के प्रती बहन का प्यार ।

Fri Dec 22 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी शहर भाजी मंडी निवासी मोहम्मद अजहर हुसैन वय 45 वर्ष पिछले कई महीनों से किडनी कि बिमारी से त्ररसत थे वो कुछ महीनो से डायलिसिस पर है उन के चार छोटे बच्चे हैं 2बेटी और 2बेठे है मोहम्मद अजहर हुसैन कि तकलीफ बहन देख नहीं पाई और छोटी बहन शहनाज परविन वय 32 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com