संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 19 : महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एनजीपी 4511 ची तालुकास्तरीय सभा नुकतीच कामठी पंचायत समिती सभागृहात घेण्यात आली.या सभेत युनियन चे प्रभारी अध्यक्ष जयदेवभाऊ आंतूलकर ,जिल्हा अध्यक्ष अशोक कुथे, जिल्हा सचिव ,विभागीय आयुक्त यांच्या मुख्य उपस्थितीत कामठी तालुका ग्रामपंचायत कर्मचारी युनियन ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली ज्यामध्ये कामठी तालुका ग्रा प कर्मचारी युनियन च्या कामठी तालुकाध्यक्षपदी येरखेडा ग्रा प चे कर्मचारी जॉनी वंजारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जाहीर कार्यकारिणी नुसार अध्यक्षपदी जॉनी वंजारी, उपाध्यक्षपदी कैलास चौधरी, सचिवपदी रोशन अंजनकर, सहसचिव सुभाष चावके,कोषाध्यक्ष विष्णू देऊळकर, संघटक अमर इंगोळे, तर सदस्यपदी वैशाली भगत,भावना पैडुलवार, विशाल जनधारे, प्रवीण धुणे,हंसराज मेश्राम, भास्कर तानेक, चेतन झाडे, पुजाराम जार्वेकर ची नियुक्ती करण्यात आली.