19 % घोषित पगारवाढ म्हणजे निवडणुकीचा जुमला

नागपूर :- महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या आंदोलनाची दखल घेत मा.उर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दि.9 सप्टेंबर रोजी वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांना 19% वेतन वाढ एप्रिल 2024 पासून लागू करण्या बाबत घोषणा केली.

ऊर्जामंत्री यांनी प्रशासना समोर मूळ वेतनात 19 % घोषित केलेल्या पगारवाढ या शब्दाचा शब्दछळ तिन्ही वीज कंपनीच्या चाणाक्ष प्रशासकीय अधिकारी वर्गाने करून 19% पगारवाढीला निवडणूकीचा जुमला ठरवला आहे कि काय ? अशी शंका भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाला आहे. निवडणूकी नंतर शासनाकडून किमान वेतन वाढेल व त्यानंतर जाहीर केलेली 19% वाढ रक्कम गायब होणार असल्याचे निर्मिती वितरण व पारेषण यांच्या परीपत्रकात दिसत आहे. मग याला पगारवाढ म्हणता येईल का? असा सवाल महामंत्री सचिन मेंगाळे यांनी प्रशासनाला विचारला. शब्दछळ न करता संघटने सोबत मीटिंग घ्यावी तसेच वित्त विभागाने तातडीने कंत्राटदारांना पैसे दिल्यास तिन्ही कंपनीतील कामगारांना दिवाळी आनंदात साजरी करता येईल अन्यथा कामगार नाराज होतील व याचे विपरीत परिणाम आगामी काळात राजकीय पटलावर नक्कीच दिसतील असे अध्यक्ष निलेश खरात म्हणाले. प्रशासनाने केलेल्या या कृत्याचा जाहीर निषेध महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने पत्राद्वारे नोंदवला असून,कामगार हितार्थ पुन्हा आंदोलनाची तयारी असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दिवाळीत घरातील अनुपयोगी वस्तु संकलनासाठी मनपाची १५० केंद्रे

Wed Oct 23 , 2024
नागपूर :- दिवाळीनिमित्त घरोघरी स्वच्छता केली जाते. आपले शहर हे देखील आपले घरच आहे. स्वच्छते दरम्यान घरातून निघणाऱ्या अनुपयोगी वस्तूंचे संकलन करून त्याचा पुनर्वापर करण्याचा महत्त्वाचा निर्णय नागपूर महानगरपालिकेने स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी अभियानंतर्गत घेतला आहे. घरातून निघणाऱ्या वापरात नसणाऱ्या अनुपयोगी वस्तूंचा स्वीकार करण्यासाठी मनपाने दहाही झोन निहाय १५० अनुपयोगी वस्तु संकलन/स्वीकार केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला असून, येत्या २६ ते […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!