नगर परिषद सावनेर कार्यालयात कार्यरत असलले तांत्रिक अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहात पकडले.
सावनेर – सावनेर नगर परिषद कार्यालयात एका महिन्याच्या आत २ शासकीय लाचखोर अधिकारी तसेच त्यांचे २ खाजगी व्यक्तींना अटक करण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळे यशस्वी झाले आहे. नगर परिषद कार्यालय, सावनेर येथील तांत्रिक अभियंता नितीन विनायकराव मदनकर, वय 41 वर्ष , पद – शहर स्तरीय तांत्रिक अभियंता व विलास देवरावजी राउत, वय 38 वर्ष , पद खाजगी इसम यांनी 20,000/- रूपयांची लाच रक्कम स्विकारल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूरच्या पथकाने कारवाई केली आहे .
प्राप्त माहिती नुसार यातील तक्रारदार यांना प्रधानमंत्री आवास योजनअंतर्गत घरकुल मंजुर झाले असुन तिसऱ्या टप्प्यातील चेक काढुण देण्याकरीता नगर परिषद कार्यालय,सावनेर येथील अभियंता नितीन विनायकराव मदनकर यांनी तक्रारदार यांना 25,000/- रूपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाचेची रक्कम देण्याची मुळीच
ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर येथे प्रत्यक्ष येवून तक्रार नोंदविली.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस निरीक्षक वर्षा मते, ला.प्र.वि.नागपूर यांनी तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले असता पडताळणी दरम्यान नगर परिषद कार्यालय, सावनेर येथील अभियंता नितीन विनायकराव मदनकर यांनी तक्रारदार यांना प्रधानमंत्री आवास योजनअंतर्गत मंजुर झालेल्या घरकुलाच्या तिसऱ्या टप्प्यातील चेक काढुण देण्याकरीता 25,000/- रूपये लाच मागणी करून तडजोडअंती 20,000/- रू. कार्यालयाचे आवारात विलास देवरावजी राउत, पद खाजगी इसम यांचे मार्फत पंचासमक्ष स्विकारल्याने त्यांना रंगेहात पकडले. त्यांचे विरूध्द पोलीस स्टेशन, सावनेर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक राहुल माकणीकर, अपर पोलीस अधिक्षक मधुकर गिते, ला.प्र.वि. नागपूर, योगिता चाफले, पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि.नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ती वर्शा मते, पोलीस निरीक्षक आषिश चौधरी, नापोशि अनिल बहिरे, मपोशि हर्शलता भरडकर सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर यांनी केलेली आहे.
तसेच पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांच्या कडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी इसम एजंट मार्फत कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरीक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा .
दुरध्वनी क्रमांक – 0712-295020
ई-मेल आयडी – [email protected]
टोल फ्रि क्रमांक – 1064