कोदामेंढी अरोली येथील सूर नदीतून रेतीची अवैधरित्या चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर विशेष पथकाची कार्यवाही

नागपूर :- पोलीस अधिक्षक यांचे विशेष पोलीस पथक नागपूर ग्रामीण यांनी दि. १०/११/ २०२३ रोजी पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने अवैध धंद्यावर रेड करणेकामी खाजगी वाहनाने रवाना होउन पोस्टे अरोली परीसरात पेट्रोलींग करीत असता गुप्त खात्रीशीर खबर मिळाली की, कोदामेंढी शिवारात असलेल्या सुर नदीच्या पात्रात ट्रॅक्टर द्वारे अवैध्यरित्या रेतीची चोरटया मार्गाने वाहतुक करीत आहेत. अशा बातमीवरून विशेष पथकाने कोदामेंढी सुर नदीवरील पुलावर वेळ ०६.०० वा. दरम्यान पोहचले असता एक लाल पांढत्या रंगाचा ट्रॅक्टर नदी पात्रात उभा असून काही मजूर त्या ट्रॅक्टरमध्ये घमेले पावडयाच्या साहायाने रेती भरतांना दिसुन आले म्हणुन त्यांना रेती वाहतुकीचा परवाना विचारले असता कोणताही परवाना नसल्याचे सांगीतले. टॅक्टरची माहिती विचारली असता ट्रॅक्टर क्र. एम एच- ४० / एल -३४३१ स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह ५,००,०००/- रु. व एक ब्रास रेती किं. ३०००/- रु असा एकूण ५,०३,०००/- रु. चा मुद्देमाल ट्रॅक्टरचा चालक आरोपी नामे गोलू उर्फ प्रविण मोरेश्वर ढोमणे, वय २७ वर्ष रा. कोदामेंढी यांनी त्याचा मालक नामे- निळकंठ भोजराज गोमासे दय ५३ वर्ष रा. कोदामेंढी ता. मौदा जि. नागपूर यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले.

सदरची रेतीची चोरटी वाहतुक मालकाच्या सांगण्यावरून ट्रॅक्टर द्वारे विनापरवाना अवैध्यरित्या गोणखनीज रेतीची चोरी करतांना प्रत्यक्ष मिळुन आल्याने नमुद ट्रॅक्टर चालक व मालक यांच्यावर ३७९, १०९ भादंवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपी व मुद्देमाल पोस्टे अरोली यांच्या ताव्यात पुढील तपास व योग्य कार्यवाहीकरीता देण्यात आला.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक हर्ष ए. पोहार (भा.पो.से.), अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक देविदास उसके व पोलीस नायक महेश बिसने पोलीस अंमलदार अनिल करडखेले यांनी पार पाडली.

NewsToday24x7

Next Post

जिवानीशी ठार करणाऱ्या आरोपीतांविरुद्ध गुन्हा नोंद

Mon Nov 13 , 2023
कुही :- अंतर्गत २३ किमी अंतरावरील कुही फाटा राजु धावा येथे दि. १९/११/२०२३ ०२.०० वा. ते ०२.३० वा. दरम्यान यातील फिर्यादी नामे विजेन उर्फ पांडु विजयलाल पांडे, वय ५५ वर्ष, रा. डब्लु. सि. एल. टिव्ही टॉवर, ज्योती किराणा स्टोअर्स  बेलीवाले बाबा दर्गा जवळ, सुरेंद्रनगर नागपुर ता. जि. नागपुर हा दिड ते दोन महीण्यापासुन राजु रहेंगरे यांच्या ढाब्यावर भांडे धुण्याचे काम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com