जिवानीशी ठार करणाऱ्या आरोपीतांविरुद्ध गुन्हा नोंद

कुही :- अंतर्गत २३ किमी अंतरावरील कुही फाटा राजु धावा येथे दि. १९/११/२०२३ ०२.०० वा. ते ०२.३० वा. दरम्यान यातील फिर्यादी नामे विजेन उर्फ पांडु विजयलाल पांडे, वय ५५ वर्ष, रा. डब्लु. सि. एल. टिव्ही टॉवर, ज्योती किराणा स्टोअर्स  बेलीवाले बाबा दर्गा जवळ, सुरेंद्रनगर नागपुर ता. जि. नागपुर हा दिड ते दोन महीण्यापासुन राजु रहेंगरे यांच्या ढाब्यावर भांडे धुण्याचे काम करीत असे व तेथे जेवन करून राहत असे. व फिर्यादी सोबत आरोपी क. १) मंडला उर्फ छोटु वय ३५ ते ३६ वर्ष हा ढाब्यावर पोळ्या करण्याचे व वेटरचे काम करत असे. आरोपी क. २) आदी वय २८ ते २९ वर्ष हा वेटरचे काम करत असे. तसेच जामकर नावाची महीला ही पोळी बनवायचे काम करीत असे. दि.२१/११/२०२३ रात्री ०९.०० वा. दरम्याण राजु हेंगरे यांनी जामकर या महीलेला तिच्या घरी सोडुन ढाब्यावर ०१.३० वा आपल्या कारने परत आले तेव्हा आरोपीनी कामाच्या पैशाची मागणी केली असता मृतक नामे राजु भाउराव देंगरे वय ४८ वर्ष रा. उंद्री ता. उमरेड जि. नागपुर हा दोन तिन दिवसात पैसे देतो असे म्हणाले असता. आरोपी व मृतकात बाचाबाची झाली. मृतक हा आरोपीच्या खाटेवर जावुन झोपुन गेला. व आरोपी सुध्दा बाजुला जावून झोपुन गेले. अंदाजे ०२.३० वा दरम्याण भांडे पडण्याच्या व मृतकाचा आवाज येत होता जावुन पाहले असता मंडला आणि आदि हा राजु हेंगरे यांना गळ्यात लंबी पट्टी बांधुन खिचत होते. त्या नंतर मंडलाने मृतकाला हातातील कडयाने व चाकु सारख्या हत्याराने त्याच्या तोंडावर मारले व आदिने लाकडाने त्यांच्या डोक्यावर मारले व ते राजु ढेंगरे यांना खाटेवर लेटवून त्यांच्या तोंडावर इशकुन राजु हेंगरे यांची कार घेवुन तेथुन निघुन गेले. काही वेळानी त्यांचे गावातील नातेवाईक आले असता राजु हेंगरे हे मरण पावले होते..

सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. कुही येथे आरोपीतांविरुध्द कलम ३०२, ३४ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि नितेश डोलॉकर हे करीत आहे..

NewsToday24x7

Next Post

ARMY OPENS SITABULDI FORT ON 12 NOVEMBER 2023

Mon Nov 13 , 2023
Nagpur :- Sitabuldi Fort was opened to public on the occasion of Deepavali i.e. 12 November 2023. Approx 241 numbers of Nagpurians residents came to visit the Historic Fort and enjoy the Heritage Tour.        

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com