आजनी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- तालुक्यातील आजनी येथील सावित्रीबाई जोतीराव फुले अभ्यासिका आणि वाचनालयाच्यावतीने शनिवार दिनांक २१ जानेवारी २०२३ रोजी गावातील १० आणि १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी उमेश म्हस्के होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ विजय रडके, सरपंच संजय जिवतोडे, उपसरपंच हेमराज दवंडे, पोलीस पाटील बळवंतराव रडके, तुकाराम लायबर, अशोक हिवरकर, बळवंतराव, नेऊलकर, कृष्णा दवंडे, गजानन घोडे, कवडू चींचुलकर, सुधाकर विघे, बापू भोयर, अनिकेत इंगोले, माला इंगोले, हेमलता उकेबोंदरे, गायत्री हरणे, राधेश्याम काकुनिया, घनश्याम मामा चकोले, राहुल शेळके, प्रफुल्ल नागोसे, मेघा वाट, कविता उईके, निकिता वानखेडे, भारती वाट, सचिन हेटे, नामदेव हेटे सर, शेळके, रंजना दवंडे, अनुराग रडके, अमोल गजभिये, निखिल विघे, शेषराव घोडे, गजेंद्र ढोक, दीपक घोडे, महेंद्र भोयर, आदींची उपस्थिती होती.

या प्रसंगी ज्येष्ठ गजलकार ज्ञानेश्वर वांढरे यांचा सत्कार करण्यात आला.तर परी दवंडे या चिमुकलीने लावणी सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. स्वागत गीत मृणाल वाट हिने सादर केले. राहुल गिऱ्हे यांनी वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रियांका घोडे या विद्यार्थिनीला आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली. सुधाकर वीघे, घनश्याम मामा आणि माला इंगोले यांनी अभ्यासिकेला आर्थिक मदत केली. संचालन कवी लिलाधर दवंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुहानी फुकट हिने केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऋषिकेश भोयर, रोशन दवंडे, अंकित जेवडे, पवन घोडे, मोना ठाकरे, तृप्ती हिवरकर, अविनाश पारेकर, शिव नाईक, करण भिवगडे, मोहित वाट, राजकुमार दवंडे, कार्तिक दवंडे, रेणुका माता क्रीडा मंडळाचे खेळाडू, राजेश फुले, तनुश्री शेंडे,सुचिता वानखेडे, खुशी वांढरे, कौस्तुभ वाट , प्रतिभा दवंडे, स्वप्ना वाट, गजेंद्र वाट आदींनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर

Mon Jan 23 , 2023
हॅलो मेडीकल फाऊंडेशन उत्कृष्ट स्वयंसेवी संस्था डॉ. प्रमोद पोतदार, डॉ.उमेश कदम, डॉ. सदानंद राऊत, संदीप आचार्य मानकरी  मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. उस्मानाबाद येथील हॅलो मेडीकल फाऊंडेशनला उत्कृष्ट स्वयंसेवी संस्थेसाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने या पुरस्कार बाबतची माहिती देण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com