जबरी संभोग करणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :-पोलीस ठाणे एम.आय.डी.सी हद्दीत राहणारी १३ वर्षीय अल्पवयीन फिर्यादी हिला तिचे परिचयाचा आरोपी सुरज वसंत राठोड, वय २१ वर्षे, रा. घर क. १२१६, वार्ड नं. ५. रायपूर, ता. हिंगणा जि. नागपूर याने ओळखीचा फायदा घेवुन फिर्यादी मुलीस कार्यक्रमावरून घरी नेत असतांना तिला जबरीने पोलीस ठाणे एम.आय.डी.सी हद्दीत एका ठिकाणी नेवुन तिचे सोबत जबरीने शारिरीक संबंध प्रस्थापीत करून तिला घरा जवळ नेवुन सोडुन दिले. पिडीत मुलीने घडलेल्या घटनेबाबत तिचे आईला सांगीतले.

याप्रकरणी फिर्यादी मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे एम.आय.डी.सी येथे पोउपनि आरवेल्ली यांनी आरोपीविरूध्द कलम ३७६ (२) (एन), ३७६ (३), ३६३, ३६६ भा.द.वि. सहकलम ४. ६ पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शालेय विद्यार्थ्यांनी जागवला शौर्याचा इतिहास, महाराष्ट्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमात सादरीकरण

Thu May 2 , 2024
नागपूर :- स्वराज्याच्या निर्मितीत प्राणांची आहुती देणारे शुरवीर, महाराष्ट्राची गौरवशाली सांस्कृतिक परंपरा आणि देशभक्तीपर गितांवर उत्तम नृत्याविस्कारातून शालेय विद्यार्थ्यांनी गौरवशाली शौर्याचा इतिहास जागविला, औचित्य ठरले महाराष्ट्र राज्याच्या 64 व्या वर्धापनदिनाचे. येथील वसंतराव देशपांडे सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रोहिणी कुंभार, उपशिक्षणाधिकारी सुशील बनसोड, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com