आय.पी.एल. क्रिकेट मॅचवर सट्टा खायवळी करणारे तीन आरोपी ताब्यात, एकूण १४,४६,२००/- रू चा मुद्देमाल जप्त

नागपूर :- लकडगंज पोलीसांचे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोलीस ठाणे हद्दीत बि.टी.पी हॉटेल, सतनामी नगर,लकडगंज, नागपूर येथे आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा सुरू आहे अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, नमुद घटनास्थळी गेले असता, तेथे आरोपी क. १) अजय विजय सोनी, वय ३० वर्षे, रा. १३४, गणेश डेअरी जवळ, कोरवा, छत्तीसगढ २) विनय निलकमल वर्मा, वय २७ वर्षे, रा. पर नं. ९, जुना बस स्टॅण्ड, कोरवा, छत्तीसगढ़ ३) तरंग पवन अग्रवाल, वय २७ वर्ष, रा. मेनरोड, सितावाडी, कोरबा, छत्तीसगढ़ हे तिथे त्यांचे साचिदार पाहिजे आरोपी क. ४) हरीष केसरवानी वय ४५ वर्ष रा. जुना बस स्टॅण्ड, कोरवा, छत्तीसगढ़ ५) हॉटेल संचालक उमेश शेंडे रा. आंबेडकर चौक, वर्धमान नगर, नागपूर यांचे मदतीने स्वतः ये आर्थिक फायदयाकरीता संगणमत करून आय.पी.एल लाईव्ह किकेट मॅचवर मोबाईलवरून संभाषण करून क्रिकेट सट्टयाची ऑनलाईन खायवळी करतांना प्रत्यक्ष मिळून आले. आरोपींचे ताब्यातुन एक एल.ई.डी टिव्ही, सेट टॉप बॉक्स, रिमोट, अॅपल कंपनीचा एक लॅपटॉप, ३ मोबाईल फोन, रोख ७,२००/- रू व चार चाकी वाहन किया क. एम.एच १२ बी.एम ७७५५ असा एकूण १४,४६,२००/- रू. चा मुद्देमाल मिळाल्याने जप्त करण्यात आला. आरोपींना ताब्यात घेवुन, त्यांचेविरूध्द पोलीस ठाणे लकडगंज येथे कलम ४, ५ महा. जुगार प्रतिबंधक कायदा अन्वये कारवाई करण्यात आली.

वरील कामगिरी पोलीस आयुक्त नागपूर शहर, सह पोलीस आयुक्त नागपूर शहर, अपर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग), मा. पोलीस उप आयुक्त (परि क. ३), सहा. पोलीस आयुक्त (लकडगंज) यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि, वैभव जाधव, पोनि (गुन्हे) साईनाथ रामोळ, पोउपनि संदिप शिंदे, पोहवा, सुखदेव गिरडकर, नापोअं. आनंद मररकोल्हे, पोअं. शकील शेख, मयूर बन्सोड व स्वप्नील तांदुळकर यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जबरी संभोग करणाऱ्या आरोपीस अटक

Wed May 1 , 2024
नागपूर :-पोलीस ठाणे एम.आय.डी.सी हद्दीत राहणारी १३ वर्षीय अल्पवयीन फिर्यादी हिला तिचे परिचयाचा आरोपी सुरज वसंत राठोड, वय २१ वर्षे, रा. घर क. १२१६, वार्ड नं. ५. रायपूर, ता. हिंगणा जि. नागपूर याने ओळखीचा फायदा घेवुन फिर्यादी मुलीस कार्यक्रमावरून घरी नेत असतांना तिला जबरीने पोलीस ठाणे एम.आय.डी.सी हद्दीत एका ठिकाणी नेवुन तिचे सोबत जबरीने शारिरीक संबंध प्रस्थापीत करून तिला घरा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com