सार्वजनीक स्थळी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

चंद्रपूर  –  चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सार्वजनीक स्थळी कचरा करणाऱ्या व्यक्ती,दुकानांवर कारवाई करण्यात आली असुन संबंधीतांकडुन दंड वसुल करून पुन्हा सदर कृती न करण्याची ताकीद देण्यात आली.
मनपा स्वच्छता विभागामार्फत दररोज सकाळ संध्याकाळ झडाई करून शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला जातो मात्र काही उपद्रवी तत्वांद्वारे सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकला जातो. अश्यांसाठी मनपातर्फे दंडात्मक कारवाई केली जात आहे.
तसेच प्लास्टिक संदर्भात हार फुले विक्रेते यांच्याकडील प्लास्टिकचे आवरण असलेले बुके व खर्रा विक्री केंद्रांवरील पन्नी देखील जप्त करण्यात आले‌ असुन प्लास्टिकचा वापर न करण्याची ताकीद त्यांना देण्यात आली. सदर कारवाईस मनपा वैद्यकीय अधिकारी स्वच्छता अमोल शेळके व उपद्रव शोध पथकाचे भूपेश गोठे, प्रदीप मडावी, संतोष गर्गेलवार, महेंद्र हजारे उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गणेशोत्सव २०२२ - पीओपी मुर्तीस पुर्णपणे बंदी

Fri Aug 5 , 2022
रेन वॉटर हार्वेस्टींगबाबत देखाव्यास ; मनपातर्फे आकर्षक बक्षिसे चंद्रपूर : यंदा महाराष्ट्रात गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. मात्र श्रीगणेशाच्या पीओपी मुर्तींवरील बंदी कायम आहे तेव्हा निर्बंध नसले तरी पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन मनपाद्वारे करण्यात येत आहे. मागील वर्षी शहरात पीओपी मुर्ती वापरास पुर्णपणे बंदी घालण्यात आली होती, चंद्रपूर शहर महानगरपालिकेने व्यापक जनजागृती केली त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळुन एकही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com