नागपूर :- विश्वस्त मंडळाचा ठराव क्र. ६/९५१/२८.१०.९९/का.अ./विटाभट्टी च्या अनुषंगाने मौजा भरतवाडा व पुणापूर येथील कुभारांना/विट्टा भट्टी धारकांना पालकमंत्री, याचे निर्देशानुसार सन १९९९ ला भूखंड परवान्यावर वाटप करण्याच्या दृष्टीने स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात देवून अर्ज मागविण्यात आले होते व सदर ठरावाच्या अनुषंगाने भूखंड वार्षिक परवान्यावर देण्यात आलेले होते, त्यापैकी १०४ भूखंड धारकांना सदर भूखंडके तात्पुरत्या परवान्यावर वाटप करण्यात आले होते.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने शासन निर्णय क्रमांक नासुप्र/१६२३/प्र.क.१०८/नवि-२६ दि. १६.१०.२०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार मौजा भरतवाडा व पुणापूर येथील जागेवर बसलेल्या विट्ट भट्टी धारकांना भौजा पारेगाव खसरा क. ११०, १११, ११२ (पार्ट) व मौजा खैरी, खसरा क. १५१ (पार्ट), १५२/१, १५३ (पार्ट) ५४/२/२ (पार्ट) येथील जागेवर स्थानांतरण करून मौजा भरतवाडा खसरा क. ११५/१,२,३, ८९/२ (पार्ट) तसेच मौजा पुनापुर खसरा क. १० ही जागा नागपूर स्मार्ट सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (NSSCDCL) यांना उपलब्ध करून देण्याबाचत शासनाची मान्यता प्राप्त झाली असुन त्यानुसार आज दिनांक २९/०२/२०२४ रोजी स्मार्ट सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. तर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.सी. (भा.प्र.से), यांना नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर तर्फे मा. सभापती मनोजकुमार सुर्यवंशी (भा.प्र.से) यांनी सदर जागेचा तावा दिला.
मौजा वारेगाव व मौजा-खैरी, येथे (जुने परवानाधारक) येथील १० हेक्टर जागेचा ताबा औष्णीक विद्युत केंद्र खापरखेडा तर्फे दि. ०४.०७.२०२३ रोजी नासुप्रला प्राप्त झालेला आहे. सदर जागेवर ना.म.प्र.वि.प्रा. नागपूर तर्फे अभिन्यास मंजूर करून १०४ विट्ट भट्टी धारकांना तेथे पुर्नवसित करण्यात येणार असून सदर जागेवर ना.म.प्र.वि.प्रा. नागपूर यांनेद्वारे अभिन्यास मंजूर झाला असून एकूण १०४ विटाभट्टी धारकांना पूर्नवसीत करण्याच्या दृष्टीने दि. ०४.०९.२०२३ रोजी जाहीर सोडत काढण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र विटभट्टीधारकांना कळविण्यात आलेले असुन (जुने परवानाधारक) यांना तात्पुरत्या परवान्यावर भूखंडाचे वाटप आजच्या सिध्द शिघ्र गणकाप्रमाणे येणाऱ्या रक्कमेवर १ टक्के प्रती वर्षाप्रमाणे परवाना शुल्क आकारून वाटप करण्यात येत आहे.