बकरी ईद च्या पाश्वरभूमीवर पोलिसांची दंगा नियंत्रण मॉक ड्रिल यशस्वी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 9 – ‘सद्रक्षणाय खलनिग्रहनाय’ या ब्रीद वाक्यानुसार परिसरातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याची मुख्य जवाबदारी ही पोलिसांवर असते तेव्हा उद्या 10 जुलै ला मुस्लिम बांधवांचा सण असलेल्या बकरी ईद दरम्यान अचानक एखादी मोठी अनुचित घटना घडून कायदा व सुव्यस्थाचा प्रश्न निर्माण झाल्यास परिस्थितो नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस प्रशासन किती कटिबद्ध राहू शकते याची परीक्षण चाचणी म्हणून आज दुपारी 2 दरम्यान जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भाजी मंडी चौकात पोलीस प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी करणाऱ्या आंदोलनकारांना पांगविण्यासाठी पोलीस प्रशासन गांभीर्याने किती वेळेत योग्य ती भूमिका घेऊ शकते यासाठी पोलिसांची घेण्यात आलेली मॉक ड्रिल यशस्वी पार पडली.
स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भाजी मंडी चौकातील नागरिक तणावपूर्ण वातावरण निर्माण करून रस्त्यावरच जाळपोळ करण्यासह पोलीस प्रशासन विरोधात रोष दर्शवित असल्याचो गुप्त माहिती पोलिसांच्या गुप्त विभागाला मिळताच पोलिसानी घटनास्थळी पोहोचून आंदोलनकाऱ्यांची चित्रफीती कॅमेऱ्यात कैद करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहितो देण्यात आली.

याप्रसंगी बघ्यांची एकच गर्दी जमली असून दोन्ही बाजूची वाहतूक ही बंद करण्यात आली होतो तर बऱ्याच वेळे नंतर एकीकडे आंदोलना ला तेज गती मिळत असल्याचे दृश्य निर्माण होतात त्वरित वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे, नवीन कामठी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे,पोलीस निरीक्षक नितीन पवार, पोलीस उपनिरीक्षक केरबा माकने, पोलीस उपनिरीक्षक राखुंडे,शैलेश यादव आदीं पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले व थोड्याच वेळात एसीपी नयन आलूरकर यासह पोलीस अधिकारी , कर्मचारी सुद्धा पोहोचले यांनी तणावपूर्ण स्थिती नोयंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस दलाच्या साहाय्याने आंदोलन काऱ्यांशी संवाद साधल्या नंतर आंदोलन कारि समजण्याच्या पलीकडे जाऊन पोलिस प्रशासन विरोधात नारेबाजी करीत पोलिसांना आव्हान देत असल्याने त्यांना चोख प्रतिउत्तर देत सौम्य लाठीचार्ज चा देखावा करताच आंदोलन काऱ्यानो एकच पळ सोडला दरम्यान जवळपास दोन जणांना तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेण्यात आले. याप्रकारे पोलीसांच्या वतीने घेण्यात येणारी मॉक ड्रिल यशस्वी ठरली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

देवेंद्र फडणवीस यांच्या बँनरवरून अख्खी भाजपाच गायब.!

Sat Jul 9 , 2022
बँनरवर फक्त देवेंद्र फडणवीस यांचा देवमाणूस म्हणून उल्लेख…. पून्हा फडणवीस समर्थकांची गोंदियात नाराजी उघड? विधान परीषद सदस्य परीणय फुके यांनी लावले बँनर गोंदिया :- गोंदियात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छाचे लावण्यात आलेल्या बँनरवरून एकटे अमित शहाच नव्हे तर कमळासह पूर्ण भाजपच गायब करण्यात आले असून फक्त देवेंद्र फडणवीस यांचा देवमाणूस म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. हे बँनर फडणवीस यांचे खंदे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com