स्वस्त धान्य दुकानातुन मागिल सहा महिन्यांपासून गरिबांची साखर गायब

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- पूर्वी स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ, साखर, तेल असे लाभार्थ्याना मिळायचे मात्र काही दिवसांनी तेल बंद झाले आता गेल्या सहा महिन्यांपासून साखर बंद आहे.होळीचा सण असूनही लाभार्थ्यांना साखर न मिळाल्याने लाभार्थ्यांची गोड साखर झाली कडू अशी स्थिती निर्माण झाली आहे.

आर्थिकदृष्ट्या कमजोर लोक कबाड कष्ट करून उन्हा तान्हातून आल्यावर चहा पिऊन आपली भूक मिटवणारा व आपला थकवा दूर करणारा साखर गेल्या सहा महिन्यांपासून बंद झाल्याने 20 रुपये कीलोची मिळणारी साखर 40 ते 42 रुपये किलो प्रमाणे साखर किराणा दुकानातून जास्त दराने आर्थिक भुर्दंड लावून विकत घ्यावे लागत आहे.आधीच जिवणावश्यक वस्तूच्या महागाईने कंबर मोडली आहे ज्यामुळे जीवन जगणे कंठीण झाले आहे.त्यातच स्वस्त धान्य दुकानातून साखर गायब झाल्याने गरीब नागरिकांना किराणा दुकानातुन जास्त दराने साखर घ्यावे लागत आहे त्यामुळे नागरिक चहातुन मुक्त होण्याच्या मार्गावर आहे.हातावर आणून पानावर खाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने त्यांना स्वस्त धान्य दुकानातून गेल्या सहा महिन्यापासून साखर मिळत नसल्याने शासनावर रोष व्यक्त केल्या जात आहे.

अंत्योदय धारकांना सुद्धा साखर तसेच 35 किलो धान्य बरोबर मिळत नसल्याची ओरड सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

'आयडब्लूबीपी ' नव्या सॉफ्टवेअरमुळे कामठी नगर परिषद ला दिलासा

Sun Mar 24 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- आर्थिक वर्ष 31 मार्च अखेरला संपणार आहे त्यामुळे मार्च अखेरपर्यंत कर वसुली करण्याची कामठी नगर परिषदची लगबग सुरू आहे.तर मार्च अखेर पर्यंत कर वसुलीत गुंतलेले नगर परिषद कर्मचाऱ्यांना दिलेली नवीन आयडब्लूबीपी सॉफ्टवेअर यंत्रणा सोयीचे ठरत असून कामे करताना प्रशासनाला समाधान प्राप्त होत आहे.तर आर्थिक वर्षातील कामे पूर्ण करण्यात प्रशासनाला सोयीचे होत आहे. कामठी नगर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com