महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत नागपूर-चंद्रपूर-गोंदिया परिमंडल संघाची दमदार कामगिरी 

– 7 सुवर्णपदक आणि 8 रोप्य पदकासह तिस-या स्थानी

नागपूर :- महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत नागपूर-चंद्रपूर-गोंदिया परिमंडलाच्या संघाने दमदार कामगिरी करीत 7 सुवर्णपदक आणि 8 रोप्य पदक पटकाविले.

या स्पर्धेत सर्वाधिक पदके मिळविणाऱ्या पुणे-बारामती परिमंडलाच्या संघास सर्वसाधारण विजेतेपद देण्यात आले. कोल्हापूर परिमंडलास उपविजेतेपद देण्यात आले तर गुणतालीकेत नागपूर- चंद्रपूर- गोंदीया परिमंडलाचा संघ तिस-या क्रमांकावर राहिला. महावितरणचे संचालक (मानव संसाधन) अरविंद भादीकर यांच्या हस्ते विजेत्यांना करंडक प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्पर्धेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष व छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, प्रादेशिक संचालक (पुणे) अंकुश नाळे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्य महाव्यवस्थापक (तांत्रिक आस्थापना) सु‍चित्रा गुजर, मुख्य अभियंता भुजंग खंदारे (प्रकल्प), राजेंद्र पवार (पुणे), परेश भागवत (कोल्हापूर), मुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांचीही उपस्थिती होती.

या स्पर्धेत नाशिक-जळगाव, छत्रपती संभाजीनगर-लातूर-नांदेड, कल्याण-रत्नागिरी, सांघिक कार्यालय-भांडूप, नागपूर-चंद्रपूर-गोंदिया, अकोला-अमरावती, पुणे-बारामती व कोल्हापूर अशा 16 परिमंडलांचे 8 संयुक्त संघांतील जवळपास 1500 खेळाडू सहभागी झाले होते. नागपूर-चंद्रपूर-गोंदिया परिमंडल संघातील सर्व विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे, गोंदिया परिमंडलाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांचेसह तीनही परिमंडलातील अधिकारी व कर्मचा-यांनी अभिनंदन केले आहे.

नागपूर – चंद्रपूर – गोंदिया परिमंडल पदक तालिका

धावणे 1500 मीटर महिला -स्वाती दमाहे (सुवर्ण पदक), लांब उडी – संगीता पुंडे (सुवर्ण पदक), बुद्धिबळ – निलेश बनकर (सुवर्ण पदक), कॅरम महिला – पुष्पलता हेडाऊ (सुवर्ण पदक), बॅडमिंटन महिला एकेरी – रितिका नायडू (सुवर्ण पदक), टेनिकॉइट एकेरी -मनीषा चोकसे (सुवर्ण पदक), बॅडमिंटन महिला सांघिक – सुवर्ण पदक, धावणे 400 मीटर महिला रीले – रौप्य पदक, उंच उडी पुरुष – महेश नागटिळक (रौप्य पदक), धावणे 800 मीटर महिला- श्र्वेतांबरी अंबादे (रौप्य पदक) , कुस्ती – महेंद्र कोसरे (रौप्य पदक), महिला कॅरम सांघिक- द्वितीय क्रमांक, टेनिकोईट सांघिक- द्वितीय क्रमांक, टेनिकोईट दुहेरी – समिधा लोहरे प्रज्ञा वंजारी (रौप्य पदक), ब्रीज सांघिक – द्वितीय क्रमांक

NewsToday24x7

Next Post

गांधीबाग झोनमध्ये इंटरकनेक्शनसाठी बंद...

Mon Feb 5 , 2024
# बाधित भागात टँकरचा पुरवठा नाही… नागपूर :- सेवेची विश्वासार्हता वाढविण्याच्या प्रयत्नात, NMC (नागपूर महानगरपालिका) ने सिताबर्डी रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 01 वर गांधीबाग झोन अंतर्गत 600 मिमी व्यासाच्या किल्ला महल फीडरच्या आंतरकनेक्शनसाठी 36 तासांचा शटडाऊन शेड्यूल केला आहे. हे 7 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10:00 ते 8 फेब्रुवारी, 10:00 वाजेपर्यंत होणार आहे. या कालावधीत, खालील भागात पाणी पुरवठ्यात व्यत्यय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com