नागपूर :- ग्राहक रांगेत उभे राहण्यापेक्षा वेळ, श्रम व पैशांची बचत करीत डिजिटल पद्धतीने वीज बिल भरणा करण्यास प्राधान्य देत आहेत. ग्राहकांना डिजिटल पद्धतीने वीज बिलाचा भरणा करता यावा, यासाठी महावितरणकडून संकेतस्थळ, महावितरण मोबाइल अॅपची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. ग्राहकांना देय रकमेवर 0.25 टक्के डिजिटल वीज बिल भरणा सूट दिली जाते. परिणामी सध्या राज्यात 70 टक्के हून अधिक वीज ग्राहक ऑनलाइन पद्धतीने वीज बिलाचा भरणा करीत आहेत. है प्रमाण वाढविण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी महावितरणने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे.
तुम्हीही व्हाल लकी डिजिटल ग्राहक
महावितरणने ऑनलाइन वीज बिल भरणाऱ्या लघुदाब ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. सलग तीन वा तीनपेक्षा अधिक वीज बिले भरून योजनेच्या लाभाची संधी ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे. ग्राहकांना लकी ड्रॉ द्वारे स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच अशी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.
योजना कुणासाठी, कालावधी काय?
1 जानेवारी ते 31 मे 2025 या कालावधीत सलग तीन वा तीनपेक्षा अधिक वीज बिले भरून योजनेच्या लाभाची संधी ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे. या योजनेसाठी 31 मार्च 2024 नंतर सलग तीन वेळा ऑनलाइन पद्धतीने वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत,
प्रत्येक महिन्यात एक लकी ड्रॉ
ग्राहक रांगेत उभे राहण्यापेक्षा वेळ, श्रम व पैशांची बचत करीत डिजिटल पद्धतीने वीज बिल भरणा करण्यास प्राधान्य देत आहेत. ग्राहकांना डिजिटल पद्धतीने वीज बिलाचा भरणा करता यावा, यासाठी महावितरणकडून संकेतस्थळ, महावितरण मोबाइल अॅपची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. महावितरणच्या प्रत्येक उपविभाग स्तरावर एप्रिल, मे व जून 2025 या प्रत्येक महिन्यात एकप्रमाणे तीन लकी ड्रॉ ऑनलाइन पद्धतीने काढण्यात येणार आहेत.
स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच मिळणार
या योजनेतून प्रत्येक लकी ड्रॉ मध्ये प्रत्येक उपविभागानिहाय पाच विजेत्यांची निवड केली जाणार आहे. त्या विजेत्यांना स्मार्ट फोन व स्मार्ट वॉच ही बक्षिसे दिली जाणार आहेत.
थकबाकीदार ग्राहक अपात्र
योजनेच्या कालावधीत ग्राहकाने नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कैश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस, याद्वारे ऑनलाइन वीज बिल भरणा करता येणार आहे. मात्र, थकबाकी ठेवणारे ग्राहक या योजनेस पात्र असणार नाहीत. ही योजना सार्वजनिक पाणीपुरवठा आणि पथदिवे ग्राहकांकरिता नाही.
लकी ड्रॉ
· या योजनेत सहभागी होण्यासाठी दरमहा एकप्रमाणे सलग तीन किवा तीन पेक्षा जास्त महिने वीज बिल भरणे आवश्यक राहील.
· वीज बिलाची किमान रक्कम रु. 100 असणे आवश्यक आहे. एक ग्राहक क्रमांक केवळ एका बक्षिसासाठी पात्र असणार आहे, असे महावितरणच्या वतीने कळविले आहे.
· सविस्तर अटी आणि शर्तीसाठी महावितरणच्या www.mahadis com.in या संकेतस्थळाला भेट द्या