राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणांतर्गत महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधानांचे आभार

मुंबई :- राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणांतर्गत महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी येथे हे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर साकारले जाणार असून, त्या माध्यमातून सुमारे 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. हे क्लस्टर तयार करण्याची जबाबदारी प्रकल्प अंमलबजावणी संस्था म्हणून एमआयडीसी ची असणार आहे. 297.11 एकर जागेवर हे क्लस्टर साकारण्यात येणार असून, त्यासाठी पायाभूत सुविधांवर 492.85 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यातील 207.98 कोटी रुपये हे केंद्र सरकार महाराष्ट्राला देणार आहे. या क्लस्टरच्या माध्यमातून 2000 कोटींची गुंतवणूक येणार असून, सुमारे 5000 वर रोजगार निर्माण होणार आहेत. माहिती-तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी नवी दिल्ली येथे ही घोषणा केली. मे. आयएफबी रेफ्रिजीरेशन लि. यांनी 450 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या लक्ष्यासह बांधकामसुद्धा सुरू केले आहे. आगामी 32 महिन्यात हे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर साकारण्यात येणार आहे. यात इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, सोलार पीव्ही मॅन्युफॅक्चरिंग, ई मोबिलिटी उत्पादक आणि घटक इत्यादी उद्योग मोठ्या प्रमाणात येणार आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष टपाल पाकिटाचे अनावरण

Tue Nov 1 , 2022
मुंबई :- लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि देशाची एकात्मता साधण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या कार्यास समर्पित करणारे विशेष टपाल पाकीटाचे अनावरण बिर्ला हाऊस या ऐतिहासिक वास्तूत करणे हे अभिमानास्पद असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त आणि एकता दिनानिमित्त भारतीय टपाल विभाग आणि बिर्ला समूहाच्यावतीने विशेष टपाल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com