महिनाभरात १८.६३ कोटी थकीत मालमत्ता कर जमा, मनपा ‘अभय योजना’ : २५८७९ मालमत्ता धारकांनी घेतला योजनेचा लाभ

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेमार्फत सुरू करण्यात आलेल्या ‘अभय योजने’ला नागपूरकरांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १ जानेवारीला या योजनेचा शुभारंभ झाला. तेव्हापासून ५ फेब्रुवारीपर्यंत शहरातील दहाही झोनमधून अभय योजनेच्या माध्यमातून १८ कोटी ६३ लक्ष ७९ हजार ४५८ रुपये थकीत मालमत्ता कर नागपूर महानगरपालिकेच्या निधीत जमा झालेला आहे. नागपूर शहरातील जास्तीत जास्त मालमत्ता धारकांनी या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ घेउन थकीत कराची पाटी कोरी करून घेण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

थकीत मालमत्ता कर, पाणी शुल्क, बाजार विभागाचे दुकाने, ओटे, जागेच्या वापर शुल्कावरील शास्ती व दंडात ८० टक्के सूट देणा-या ‘अभय योजना’चा शुभारंभ १ जानेवारी रोजी नागपूर महानगरपालिकेने केला. ३१ मार्च २०२४ पर्यंत ही योजना सुरू राहणार असून नागपूरकरांना मालमत्ता कर, पाणी शुल्क, बाजार विभागातील दुकाने, जागा, ओटे आदींची थकबाकी चुकवण्यात सुलभता प्रदान करण्याच्या हेतूने ही महत्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली. ५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार २५८७९ थकीत मालमत्ता कर धारकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या मालमत्ताधारकांना अभय योजनेमुळे ४.६४ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे, अशी माहिती उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम यांनी दिली.

‘अभय योजने’चा नेहरूनगर झोनमधील सर्वाधिक ४११६ लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. या लाभार्थ्यांकडून २ कोटी २३ लक्ष ८० हजार ४४१ रुपये थकीत मालमत्ता कर प्राप्त झाले. तर लक्ष्मीनगर झोनच्या ३७९० कर धारकांनी सर्वाधिक २ कोटी ९२ लक्ष ३९ हजार ३१३ रुपये थकीत मालमत्ता कर जमा केले आहे. यापाठोपाठ आशीनगर झोनमधील ३६९५ कर धारकांनी २ कोटी ७९ लक्ष ५९ हजार २१९ रुपये थकीत मालमत्ता कर मनपा निधीत जमा केला.

‘अभय योजने’ अंतर्गत नागरिकांना १ जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीमध्ये थकीत मालमत्ता कर, पाणी शुल्क, बाजार विभागाचे दुकाने, ओटे, जागेच्या वापर शुल्कावरील शास्ती व दंडात ८० टक्के सूट दिली जाणार आहे. यासाठी लाभार्थ्यांनी मनपा मुख्यालय किंवासंबंधित झोन कार्यालयात जाउन किंवा ऑनलाईन पद्धतीने कर/शुल्क जमा करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

छमाही उर्स पर लहराया बाबा ताजुद्दीन का परचम,शाही संदल में उमड़े श्रद्धालु

Thu Feb 8 , 2024
– देश की सलामती की मांगी गई दुआ नागपुर :- हजरत बाबा सैयद मोहम्मद ताजुद्दीन रहमतुल्लाह अलैह के छमाही उर्स पर श्रद्धालुओं की भीड़ ताजबाग में उमड़ी. ल बुधवार की सुबह दरगाह परिसर में आस्ताना ताजुल औलिया के सज्जादानशीन हजरत सैयद यूसुफ इकबाल ताजी की सरपरस्ती एवं अमीर शरीयत मुफ़्ती अब्दुल कदीर खान साहब की अध्यक्षता में परंपरागत तरीके से […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com