मानकापूर क्रीडा संकुलासाठी 683 कोटीचा आराखडा अंतिम

नागपूर :- येथील मानकापूर क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा तसेच वाणिज्यीक सुविधा उभारणीच्या मुळ कामाकरिता रुपये 473 कोटी व विमा, जीसटी व इतर सेवा शुल्क मिळून एकूण 683 कोटीचा आराखडा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने अंतिम करण्यात आला असून हा प्रस्ताव प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्धतेसाठी शासनाकडे तातडीने सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या.

विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक बिदरी यांच्या दालनात आज आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, क्रीडा प्रशिक्षक विजय मुनिश्वर पियुष अंबुलकर आदि उपस्थित होते.

नागपूर येथे ऑलम्पीक व एशीयन क्रीडा स्पर्धांच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे अद्यावत क्रीडा संकुल उभारण्याच्या कामाला गती मिळण्यासाठी निधी उपलब्धतेनुसार क्रीडा सुविधेची कामे प्राधान्याने करण्याचे व इतर कामे टप्प्याटप्याने पूर्ण करण्याचे आयुक्त बिदरी यांनी आराखड्याचा आढावा घेतांना सांगितले. तर जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सर्व कामे आंतरराष्ट्रीय मानकानुसार समाविष्ठ करण्याच्या सूचना दिल्या.

अंतिम आराखड्यानुसार सदयःस्थितीतील क्रीडा सुविधांचे बळकटीकरण, स्पोर्ट्स क्लब, स्पोर्ट्स सायन्स सेंन्टर, साहसी क्रीडा प्रकारासाठी सुविधा, अद्यावत फुटबॉल स्टेडियम, हॉकी अॅस्ट्रोटर्फ, अद्यावत अॅथलेटीक्स स्टेडीयम, टेनिस कोर्ट्स, मल्टीजीम, स्पोर्ट्स एज्युकेशन अॅन्ड इनफॉरमेशन सेंटर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर, ऑलम्पिक साइज जलतरण तलाव, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, कुस्ती, आर्चरी, शुटींग, फेंन्सींग, स्क्वाश, बॉक्सींग, जुडो, कराटे, तायक्वांडो, टेबल टेनिस, बास्केटबॉल, सॉफ्टबॉल, हॅन्डबॉल, क्रीकेट व आवश्यकतेनुसार इतर खेळांच्या सुविधा, तसेच एकूण 1200 खेळाडूंकरिता निवास व्यवस्था, 700 वाहनांकरिता पार्कींग व त्यावर सोलर विद्युत प्रणाली उभारण्यात येणार आहे

क्रीडा सुविधा व सदर संकुल उभारणी नंतर त्याचे व्यवस्थापनाचा खर्च भागवण्यासाठी वापरा व हस्तातर तत्वार क्लब हाऊस, शॉपींग कॉम्प्लेक्स, तारांकीत हॉटेल, स्पोर्टस् क्लब आदी वाणिज्यीक प्रकल्प उभारण्याचा देखील आराखड्यात समावेश आहे.

बैठकीला क्रीडा, सार्वजनिक बांधकाम, महानगरपालीका व इतर सबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पुरामुळे क्षतिग्रस्त झालेल्या गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करा - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Tue Jan 30 , 2024
– रस्ते विकास कामांचा घेतला आढावा – जिल्ह्यातील रस्त्यांच्या विविध कामांना गती देण्याचे निर्देश नागपूर :- पुरामुळे क्षतीग्रस्त झालेल्या गावांतील रस्ते दुरुस्तीची कामे प्राधान्याने हाती घेऊन तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवा. या कामांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करू असे सांगत सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद ,राष्ट्रीय महामार्ग आणि विविध योजनांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या व नियोजित रस्त्यांच्या कामांना गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com