निवडणूक निरीक्षक नेहा चौधरी यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षास भेट

मुंबई :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या माध्यम व सनियंत्रण कक्षास 26- मुंबई उत्तर मतदारसंघासाठी नियुक्त खर्च विभागाच्या निवडणूक निरीक्षक नेहा चौधरी यांनी आज दुपारी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, उपजिल्हाधिकारी सुभाष काकडे, निवडणूक निरीक्षकांच्या संपर्क अधिकारी अनुपमा पाटील आदी उपस्थित होते. श्रीमती चौधरी या भारतीय राजस्व सेवेतील (आयआरएस) वरीष्ठ अधिकारी आहेत. 26- मुंबई उत्तर या लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या विधानसभेच्या 152- बोरीवली, 153- दहिसर आणि 154- मागाठणे मतदारसंघातील खर्चविषयक बाबींचे निरीक्षक म्हणून चौधरी काम पाहतील.

निवडणूक निरीक्षक चौधरी यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाची माहिती घेतली. जिल्हाधिकारी क्षीरसागर, अपर जिल्हाधिकारी गोहाड यांनी त्यांना माध्यम कक्षाच्या कामकाजाची सविस्तर माहितीसह दैनंदिन सादर करण्यात येणाऱ्या अहवालांची माहिती दिली. माध्यम कक्षाचे कामकाज जाणून घेतल्यानंतर निवडणूक निरीक्षक चौधरी यांनी समाधान व्यक्त केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वंदना रायबोले को आदर्श महिला उद्यमी पुरस्कार की घोषणा

Mon Apr 29 , 2024
नागपूर :- साहित्यधारा बहुउद्देश्यीय धर्मार्थ संगठन, छत्रपति संभाजीनगर ने कामठी की लघु उद्यमी वंदना दीपक रायबोले को अत्यधिक प्रतिष्ठित राज्य स्तरीय ‘आदर्श महिला उपभोक्ता पुरस्कार’ देने की घोषणा की है। साहित्यधारा बहुउद्देशीय धर्मार्थ संगठन चयन समिति के अध्यक्ष डॉ. संघर्ष सावले ने उन्हें पत्र के माध्यम से जानकारी दी है । इस राज्य स्तरीय पुरस्कार का वितरण समारोह 5 मई […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com