ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्याकडे खानापूर विधानसभा निवडणूक निरीक्षक जबाबदारी

नागपूर :- लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यात सांगली लोकसभेतील खानापूर विधानसभेचे निवडणूक निरीक्षक म्हणून भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जबाबदारी सोपविली आहे.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यामार्फत जबाबदारीचे पत्र प्राप्त होताच ॲड. मेश्राम खानापूर करिता रवाना झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यात सांगली लोकसभा क्षेत्रामध्ये ७ मे रोजी मतदान होणार आहे. यादृष्टीने संघटन आणि बूथ नियोजन यादृष्टीने कार्य करण्यासंदर्भात सांगली लोकसभेतील खानापूर विधानसभेचे निवडणूक निरीक्षक म्हणून ॲड. मेश्राम यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्याकडे ५ मे पर्यंत ही जबाबदारी असेल.

या जबाबदारीकरिता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे ॲड. मेश्राम यांनी आभार मानले आहे व दिलेली जबाबदारी पूर्ण ताकदीने पूर्णत्वास नेण्याबाबत विश्वस्त केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनरेगांतर्गत बांबू लागवडीला प्राधान्य द्या - मिशन महासंचालक नंदकुमार

Mon Apr 29 , 2024
Ø नागपूर विभागाची आढावा बैठक नागपूर :-  बांबू लागवडीमुळे रोजगार निर्मिती, पर्यावरण रक्षण, हरित आच्छादनात वाढ होते व सिंचन व्यवस्था बळकट होण्यास मदत होत असल्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) नागपूर विभागात बांबू लागवडीची कामे प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देश महाराष्ट्र मनरेगा मिशनचे महासंचालक नंदकुमार यांनी आज संबंधीत विभागांच्या यंत्रणांना दिले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ‘समता मुलक शाश्वत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com