अशोक कोल्हटकर यांचा सत्कार

– महाराष्ट्र शासन तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाल्या बद्दल पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया तर्फे अशोक कोल्हटकर यांचा कराड विद्यापीठाचे कुलगुरु डॉ वेदप्रकाश मिश्रा यांचे हस्ते गौरव

नागपूर :- महाराष्ट्र शासन तर्फे,डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण नागरी पुरस्कार,नागपूर महानगर पालिकेचे माजी जनसंपर्क अधिकारी,आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर अर्बन को ऑफ ब्याकेचे ज्येष्ठ संचालक अशोक कोल्हटकर याना मां मुख्य मंत्री, आणि मां उपमुख्यमंत्री यांचे हस्ते, मुंबई येथे आयोजित समारोहात प्रदान करण्यात आला, देशात जनसंपर्क क्षेत्रात कार्य करीत असलेल्या पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया तर्फे जनसंपर्क दिनाचे औचित्य साधून रवी भवन सभागृहात, कराड विद्यापीठाचे कुलगुरू, ज्येष्ठ विचारवंत डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या हस्ते अशोक कोल्हटकर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ एस पी सिंग,जिल्हा माहिती अधिकारी संचालक विनोद रापतवार, केन्द्र सरकारचे पत्र सूचना विभागाचे उपसंचालक शासिन राय, रां स तू म नागपूर विद्यापीठाचे जनसंपर्क विभागाचे विभाग प्रमुख डॉ मोइज् हक, महामेट्रो चे जनसंपर्क अधिकारी अखिलेश हळवे,माहिती विभागाचे जनसंपर्क समन्वयक अनिल गडेकर,म न पा चे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी,एल आय टी चे डॉ मोहन पांडे,दूरदर्शनचे रवींद्र मिश्रा,महारष्ट्र टुरिझम विभागाचे युवराज पडोळे,डॉ शोभा धनवटे, देवदत्त मराठे,डॉ प्रा केजी मिषर,अमित बाजपेयी, प्रदीप खरडणविष,मधुसूदन देशमुख, दुर्गप्रसाद अग्रवाल,अड अमोल रामटेके,यांचे सह केन्द्र,राज्य व निमशासकीय कार्यालयातील जनसंपर्क विभागाचे अधिकारी,संपादक आणि पत्रकार,मित्र, परिवार बहु संख्येनी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

निवडणूक आयोगाकडे तक्रारीनंतर ‘लोकसत्ता’ला कायदेशीर नोटीस

Mon Apr 29 , 2024
– तीन दिवसांत माफी मागण्याची ॲड. धर्मपाल मेश्राम यांची ताकीद नागपूर :- सामाजिक वितुष्ट निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘दैनिक लोकसत्ता’ मार्फत प्रकाशित वृत्ताविरोधात भारतीय जनता पार्टीने कठोर पवित्रा घेतला आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदविली. याशिवाय दैनिक लोकसत्ता वर्तमानपत्राला कायदेशीर नोटीस देखील बजावली आहे. येत्या ३ दिवसांत बिनशर्त माफी मागण्याची ताकीदही नोटीसमधून देण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com