कन्हान :- शहरात साई मंदिर जवळ महेंद्र साबरे मित्र परिवार, संह्यांद्री संस्था, लिंक वर्कर स्कीम नागपुर, दत्ता मेघे आयुर्वेदिक हाॅस्पीटल वानाडों गरी, रंजीत देशमुख डेंटल कॉलेज आणि सिटी हॉस्पीटल यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित भव्य नि:शुल्क रोग निदान शिबीराचा बहु संख्येने नागरिकांनी लाभ घेतला.
इंदिरा नगर येथील कन्हान साई मंदिर जवळ महेंद्र साबरे मित्र परिवार, संह्यांद्री संस्था, लिंक वर्कर स्कीम नागपुर, दत्ता मेघे आयुर्वेदिक हाॅस्पीटल वानाडों गरी, रंजीत देशमुख डेंटल कॉलेज (लता मंगेशकर हाॅ स्पीटल) आणि सिटी हाॅस्पीटल कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य नि:शुल्क रोग निदान शिबीरा त जनरल चेकअप, पेडेट्रेशन (लहान मुलांचे चेकअप), बी.पी शुगर, ईसीजी चेकअप, डोळे चेकअप , डेंटल चेकअप, एच आई वी आणि टी.बी चेकअप सह विविध प्रकारच्या बीमारीची तपासणी करण्यात आली.
या भव्य मोफत रोग निदान शिबीराचा कन्हान परिसराती ल एकुण ४६५ नागरिकांनी लाभ घेतला. शिबीरात लिंक वर्कर स्कीम नागपुर, दत्ता मेघे आयुर्वेदिक हाॅस्पी टल वानाडोंगरी, रंजीत देशमुख डेंटल कॉलेज (लता मंगेशकर हाॅस्पीटल) आणि सिटी हाॅस्पीटल कामठी च्या डॉक्टर सह चंमुनी सेवा प्रदान केली. शिबीराच्या यशस्वितेकरिता आयोजक महेंद्र साबरे, रिंकेश चवरे, डाॅ मनोहर पाठक, सुनिल भरडे, संदीप कभे, जया खैरकर, अजय ठाकरे, शैलेश शेळके, शरद वाटकर, सुषमा चोपकर, संजय शेंदरे, कैलाश ठाकरे, मोरेश्वर फूटाणे, सुरेश खेरगडे, मीना कळंबे, सुरेश कळं बे, आकाश वाढणकर, अमोल साकोरे, प्रतिक्षा चवरे सह परिसरातील नागरिकांनी सहकार्य केले.